जमीन हक्क आंदोलनकर्त्यांची जिल्हा कचेरीवर धडक

By Admin | Updated: July 23, 2015 00:12 IST2015-07-23T00:12:27+5:302015-07-23T00:12:27+5:30

आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीने बुधवारी इर्वीन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर जमिन हक्कासाठी धडक मोर्चा काढण्यात आला. .

Land rights activists attacked the District Collector | जमीन हक्क आंदोलनकर्त्यांची जिल्हा कचेरीवर धडक

जमीन हक्क आंदोलनकर्त्यांची जिल्हा कचेरीवर धडक

पारधी समाजाचा मोर्चा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, ई क्लास जमिनीचे पट्टे द्या
अमरावती: आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीने बुधवारी इर्वीन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर जमिन हक्कासाठी धडक मोर्चा काढण्यात आला.
यावेळी आंदोलन कर्त्याच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. आदिवासी पारधी समाज संघटनेच्या प्रमुख मागण्यामध्ये पारधी समाजालाइक्लास जमिनीचे पट्टे देण्यात यावे, घराचा नमुना आठ अ देण्यात यावा, पारधी समाजाच्या तांडयावर शाळा व अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात यावे, पारधी समाजाला खावटी कर्ज देण्यात यावे,पारधी पॅकेजचा निधी वाढविण्यात यावा आदी प्रश्नांसाठी संघटनेचे अध्यक्ष बाबबुसिंग पवार, सुखदेव पवार, चरंदास सोळंके, सलिम भोसले, नरेश पवार, राजेश चव्हाण, प्रकाश पवार, शानुदास भोसले, बाल्या पवार, ईदल पवार अलिटर पवार, महिलेश पवार यांच्या समावेश होता.

Web Title: Land rights activists attacked the District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.