बग्गी येथे जमीन आरोग्यपत्रिका प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:37 IST2020-12-11T04:37:14+5:302020-12-11T04:37:14+5:30
मृदा चाचणी प्रयोगशाळेत तपासणी, मातीतील कमी-जास्त घटकाबाबत मार्गदर्शन चांदूर रेल्वे : कृषी विभागामार्फत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानामधील जमीन आरोग्य ...

बग्गी येथे जमीन आरोग्यपत्रिका प्रशिक्षण
मृदा चाचणी प्रयोगशाळेत तपासणी, मातीतील कमी-जास्त घटकाबाबत मार्गदर्शन
चांदूर रेल्वे : कृषी विभागामार्फत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानामधील जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम सन २०२०-२१ प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमाला बग्गी येथून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मृदा चाचणी प्रयोगशाळेत मातीची तपासणी व त्यातील कमी-जास्त घटकाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
अभियानामधील शेतकरी प्रशिक्षणाकरिता चांदूर रेल्वे तालुक्यातील १० गावांची मॉडेल व्हिलेज म्हणून निवड करण्यात आली. यापैकी बग्गी येथे शेतकरी बांधवांच्या १० हेक्टरमागे एक नमुना यानुसार प्रयोगशाळेत मातीपरीक्षण करण्यात आले व अहवाल मृदा आरोग्यपत्रिकेच्या रूपाने शेतकरी बांधवांना समजून सांगण्यात आला.
बग्गी येथील राहुल खराबे यांच्या शेतामध्ये अभियाना राबविण्यात आले. प्रशिक्षण वर्गाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा. विजय चवाळे, श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे माजी मृदाशास्त्र विभागप्रमुख पी.डी. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य प्रशांत भेंडे, बग्गी येथील माजी सरपंच संगीता माकडे व राजेभाऊ फटिंग तसेच दिलीप जाधव उपस्थित होते. याप्रसंगी कृषिसहायक ए.डी. चौकडे, सराड, तलाठी वाघेला यांचा शेतकरी बांधवांकडून सत्कार करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी बांबल व मंडळ कृषी अधिकारी किल्लेकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले. कृषिमित्र विजय वासनिक, वैभव जाधव, राहुल खराबे आदींनी परिश्रम घेतले.