जळू येथून दोन बकऱ्या लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:10 IST2021-07-11T04:10:43+5:302021-07-11T04:10:43+5:30
चारचाकीची दुचाकीला धडक नांदगाव खंडेश्वर : राष्ट्रीय महामार्गावरील बेलोरा येथे एमएच २७ एआर ७३११ क्रमांकाच्या चारचाकीने एमएच ३० एम ...

जळू येथून दोन बकऱ्या लंपास
चारचाकीची दुचाकीला धडक
नांदगाव खंडेश्वर : राष्ट्रीय महामार्गावरील बेलोरा येथे एमएच २७ एआर ७३११ क्रमांकाच्या चारचाकीने एमएच ३० एम ७८१३ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये काजना येथील कासम शाह इमाम शाह यांच्या पायाला मार लागला.
-----------
शेतीच्या वादातून इसमाला मारहाण
धारणी : तालुक्यातील चुटिया शिवारात गोविंदा तुकाराम गायन (३२) यांना शेतीच्या वादातून नारायण लहानुजी गायन, किसन लहानुजी गायन, पवन किसन गायन, दिनेश नारायण गायन यांनी मारहाण केली. याप्रकरणी धारणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
------------
बॅगमधून लंपास केले दागिने
अंजनगाव सुर्जी : मूर्तिजापूर येथील अरुण रामराव ठाकरे यांचे मूर्तिजापूर-अंजनगाव सुर्जी प्रवासादरम्यान अज्ञात चोराने बसमधून त्यांच्या बॅगेतून ४५ ग्रॅम दागिने व ८०० रुपये रोख असा ६५ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरला. त्यांनी ९ जुलै रोजी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.