शिवाजीनगरात घरफोडी ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:12 IST2021-08-01T04:12:47+5:302021-08-01T04:12:47+5:30

-------------- क्षुल्लक कारणावरून काठीने मारहाण शेंदूरजनाघाट : घरासमोर बकऱ्या का बांधल्या व त्यांना का मारले, असे विचारले म्हणूम मधुकर ...

Lampas looted burglary in Shivajinagar | शिवाजीनगरात घरफोडी ऐवज लंपास

शिवाजीनगरात घरफोडी ऐवज लंपास

--------------

क्षुल्लक कारणावरून काठीने मारहाण

शेंदूरजनाघाट : घरासमोर बकऱ्या का बांधल्या व त्यांना का मारले, असे विचारले म्हणूम मधुकर परसराम गजाम (रा. वाई) याने कैलास बाबूराव आहाके यांना काठीने मारहाण केली. ३० जुलै रोजी ही घटना घडली. शेंदूरजनाघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

-------------

परतवाड्यात शासकीय निवासस्थानी चोरी

परतवाडा : सिव्हिल लाईन्स येथील शासकीय निवासस्थानाच्या शौचालयाचे गज कापून चोरट्याने आत प्रवेश केला व दोन गिजर व दोन पंखे चोरून नेले. २४ जुलै रोजी घडलेल्या या घटनेची गजानन सावळे (५२, रा. मिल कॉलनी) यांनी या प्रकरणी परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परतवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

------------

पोत दिली नाही म्हणून विवाहितेचा छळ

चांदूर बाजार : तालुक्यातील पिंपळखुटा येथे २४ वर्षीय विवाहितेला तिच्या आईने लग्नात केलेली पोत दिली नाही म्हणून तिचा छळ करण्यात आला. चांदूर बाजार स्थित महिला दक्षता समितीकडून प्राप्त अहवालावरून याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी उमेश गणेश वऱ्हाडे, गणेश बाबाराव वऱ्हाडे व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

सांगळूद येथे जागेच्या वादातून मारहाण

येवदा : नजीकच्या सांगळूद येथे २९ जुलै रोजी योगेश बाळू गावंडे (२५) सह त्याचे वडील व भावाला जागेच्या वादातून सुशील उदयभान गावंडे, भास्कर वीरभान गावंडे व अविनाश भास्कर गावंडे यांनी पावडे व कोपईच्या दांड्याने मारहाण केली. याप्रकरणी येवदा पोलिसांनी ३० जुलै रोजी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Lampas looted burglary in Shivajinagar