साहूर येथे घरातून सोन्याचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:13 IST2021-04-22T04:13:12+5:302021-04-22T04:13:12+5:30
अमरावती : दरवाजाचा कोंडा काढून आत प्रवेश करून घरातील सोन्याच्या दागिन्यांसह इतर साहित्य असा एकूण ४५ हजारांचा मुद्देमाल अज्ञात ...

साहूर येथे घरातून सोन्याचे दागिने लंपास
अमरावती : दरवाजाचा कोंडा काढून आत प्रवेश करून घरातील सोन्याच्या दागिन्यांसह इतर साहित्य असा एकूण ४५ हजारांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना वलगाव ठाणे हद्दीतील साहूर येथे १६ ते १९ एप्रिल दरम्यान घडली.
फिर्यादी शामराव महादेवराव बेलसरे(७२, रा. साहूर) यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ४५७, ४५४, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला. फिर्यादी हे १६ एप्रिल रोजी बाहेरगावी मुलीच्या घरी गेले. त्याची पत्नी आजारी असल्याने त्या एकट्याच घरी होत्या. त्यांना डोळ्याने दिसत नाही व कानाने एकू सुद्धा येत नाही. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने लंपास केले. पुढील तपास वलगाव पोलीस करीत आहे.