महिलेला घरात डांबून एक लाख रुपये लंपास!

By Admin | Updated: June 19, 2015 00:33 IST2015-06-19T00:33:17+5:302015-06-19T00:33:17+5:30

निद्रिस्त महिलेला घरात डांबून कपाटातील एक लाख रूपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली.

Lakhs of one lakh rupees in the house! | महिलेला घरात डांबून एक लाख रुपये लंपास!

महिलेला घरात डांबून एक लाख रुपये लंपास!

वरूड : निद्रिस्त महिलेला घरात डांबून कपाटातील एक लाख रूपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. बुधवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास स्थानिक श्रीरामनगरातील सुपले यांच्या घरी घडलेल्या या धाडसी चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. परंतु दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे चोरांचे धारिष्ट्य वाढल्याचा आरोप केला जात असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्थानिक पांढूर्णा चौक परिसरातील राहुल स्पेअर पार्टचे संचालक केशव सुपले यांचे श्रीरामनगर भागात निवासस्थान आहे. सायंकाळी ६ वाजता केशव सुपले आणि त्यांची पत्नी बाहेर बाजारात गेले होते. त्यांची सून घरात एकटीच होती. अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. सून श्वेताला खोलीतच डांबले आणि आलमारीतील १ लाख रुपये घेऊन पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच वरूड पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

Web Title: Lakhs of one lakh rupees in the house!