लाखोंचे बंगले चोरट्यांचे लक्ष्य
By Admin | Updated: February 9, 2015 23:05 IST2015-02-09T23:05:49+5:302015-02-09T23:05:49+5:30
नवीन घरात महागड्या फरशा, सोफासेट, सागवानच्या खिडक्या, दरवाजे यांची निवड करून आयुष्याची पुंजी खर्च करून लाखो रूपये लावले जातात़ मात्र, या घराच्या सुरक्षिततेसाठी केवळ दोनशे

लाखोंचे बंगले चोरट्यांचे लक्ष्य
मोहन राऊत - अमरावती
नवीन घरात महागड्या फरशा, सोफासेट, सागवानच्या खिडक्या, दरवाजे यांची निवड करून आयुष्याची पुंजी खर्च करून लाखो रूपये लावले जातात़ मात्र, या घराच्या सुरक्षिततेसाठी केवळ दोनशे रूपयाच्या तकलादू कडी-कोयंड्यांचीच निवड केली जाते़ मागील एक वर्षात घरी कोणीही नसतांना घरफोड्या झाल्याच्या घटनेत वाढ झाली असून चोरट्यांनी नव्या तंत्राचा वापर केला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
धामणगाव शहरानजीक असलेल्या वैभवलक्ष्मी नगरात एकाच रात्री तीन घरफोड्या झाल्या आहे़ घरात सर्व सदस्य असतांना तीन अज्ञात चोरट्यांनी दागीने लंपास केले तर दुसऱ्या घराशेजारी याच वेळेस चाकूचा धाक दाखवून चोरी केली़ या घटनेने शहरवासी भयभीत झाले आहे़ दोन वर्षा पूर्वी धामणगाव शहरातील न्यू राठी नगर येथील प्रकाश पृथ्वीराज पनपालीया यांच्या घरी कोणीही नसतांना २१ लक्ष ७२ हजार रूपयाची धाडसी घरफोडीची घटना घडली होती़ यावेळी दत्तापूर पोलीसांनी अटक केलेल्या चोरट्यांनी नव्या तंत्राचा वापर करून घरफोडी केली असल्याचे उघड झाले होते़ तर मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी मागील तीन वर्षापूर्वी दुपारी घरफोडी झालेल्या चोरीचा तपास लावला तेव्हा चोरट्यांनी समोरचा दरवाज्याचे कुलूप तोडून घरफोेडी केली असल्याचे तपासातून निशपन्न झाले आहे़
धामणगाव, चांदूर रेल्वे, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, परतवाडा, बडनेरा, दर्यापूर, शहरात व तालुक्यात दिवसेंदिवस लोकवस्ती वाढल्या प्रमाणे घराची संख्याही मोठ्या प्रमाणात कमालीची वाढली आहे़ मागील दहा वर्षात या शहरात ग्रामीण भागातून अनेक कुटूंब वास्तव्याला आली आहे़ या कुटूंबांनी आपली घरे बांधली आहे़ लाखो रूपये खर्चकरून बांधल्या जाणाऱ्या अशा घरात मुख्य दरवाजा आकर्षक दिसावा म्हणून बिडापासून तयार केलेला फॅशनेबल कडी-क ोयंडा बसविला जातो़ या कडी-कोयंड्यावर गोदरेजचे कुलूप दर्जेदार बसविले जाते़ पण दगडाच्या एका घावातही तुटेल अशा कडी-कोयंड्याला बसविलेल्या या कुलूपाचाही काही उपयोग होत नाही़ अशी परिस्थिती या सर्व शहरात आहे़बाजारात स्टिल, बिड, कास्टींग पासून तयार केलेल्या कडी-कोयंड्याचीच क्रेझ आहे़ दिसायला अधीक आकर्षक दिसणारे हे क डी-कोयंडे मजबुत नाहीत़ अनेकदा सिध्द झाले आहे़ विशेषत: बिडा पासून तयार केलेले कडी-कोयंडे तर दगडाच्या एका घावातही तुटू शकतात़ आपण बांधलेले घर अधीक सुरक्षित रहावे यापेक्षा त्याचा दिखावूपणा इतरांना दिसावा अशाच पध्दतीने काही घरे बांधलेली दिसतात़ मुख्य दरवाजा सागवान लाकडापासून तयार केलेला जातो़ त्याला केलेल्या पॉलीशची चकाकी दिसावी म्हणून त्या दरवाज्यापुढे दुसरा सुरक्षीत लोखंडी दरवाजाही बसवला जात नाही़ हा लोंखडी दरवाजा सुध्दा चोरीसारख्या घटना टाळू शकतो पण असे दरवाजे बसविण्याची मानसिकता लोकांमध्ये दिसत नाही़
कडी-कोयंडा बरोबरच दरवाजाच्या लाकडातच बसतील अशा पध्दतीची लॅचीगची कुलपे बाजारात आहे़ हे कुलपे सहसा उघडता येत नाही़ ही कुलपे तोडायला अवघड असतात़ पण अशी कुलपेही बसविणारा वर्ग कमी आहे़ चांगल्या कंपनीने अशा पध्दतीचे कुलूपे तयार केलेली आहे़ एका एका घराला तिन ते चार दरवाजे असतात़ यापैकी मुख्य दरवाज्याला अशी लॅचची कुलपे बसविली जातात़ इतर दरवाजे कडी-कोयंड्यानीच सजविले जातात़ नागरीकांची ही मानसिकता बदलविणे आवश्यकता आहे़