चांदूररेल्वेत अवकाळी पावसाचा कहर
By Admin | Updated: May 6, 2015 00:16 IST2015-05-06T00:16:45+5:302015-05-06T00:16:45+5:30
शहरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी पावसासह गारपीट झाल्याने विद्युत मंंडळाचे प्रचंड नुकसान झाले.

चांदूररेल्वेत अवकाळी पावसाचा कहर
वीजपुरवठा खंडित : व्यापाऱ्यांचेही अतोनात नुकसान
चांदूररेल्वे : शहरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी पावसासह गारपीट झाल्याने विद्युत मंंडळाचे प्रचंड नुकसान झाले. वादळामुळ अनेक झाडे उन्मळून पडली. विद्युत तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वेगात वादळ सुटल्याने शहरातील दुकानदारांची एकच तारांबळ उडाली होती. शहरातील मुख्यमार्गावरील मोठे वृक्ष विद्युत खांबावर कोलमडून पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला. नगर पालिकेसमोरील मोठे झाड रस्त्यावर पडले. सिनेमा चौकात अशोक छाजेड यांच्या घराजवळ मोठे झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. ओक यांच्या घरासमोरील झाड पडून तिवस्याकडील वाहतूकीला अडथडा निर्माण झाला होता. विद्युत पुरवठा सुरु करण्यासाठी मंगळवारी सकाळपासून यंत्रणा कामाला लागली. परंतु विद्युत पुरवठा खंडितच होता. चांदूरवाडी येथे घरासमोरील गाय व वासरु झाडाखाली असल्याने एक वासरु ठार झाल्याची माहिती तहसीलदार अहमद यांनी दिली. परिसरातील भाजीपाला व आंब्याचे नुकसान झाल्याची माहिती आहे.