शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

जमिनीत आर्द्रतेचा अभाव; तुरीवर ‘मर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:23 IST

चार महिन्याच्या कालावधीतील कमी पाऊस व दोन वेळा पावसाचा खंड व परतीचा पाऊसही बेपत्ता यामुळे जिल्ह्यातील हलक्या व मध्यम जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे. पीक फुलोºयावर येत असताना आर्द्रतेअभावी फुलोर गळायला लागला आहे. पीकदेखील पिवळे पडून ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अडचणीत भर : हलक्या, मध्यम जमिनीतील पिके पिवळी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चार महिन्याच्या कालावधीतील कमी पाऊस व दोन वेळा पावसाचा खंड व परतीचा पाऊसही बेपत्ता यामुळे जिल्ह्यातील हलक्या व मध्यम जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे. पीक फुलोऱ्यावर येत असताना आर्द्रतेअभावी फुलोर गळायला लागला आहे. पीकदेखील पिवळे पडून ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.जिल्ह्यात आंतरपीख या अर्थानेच तुरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात खरिपाचे सहा लाख ८४ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र असताना १ लाख १३ हजार हेक्टरमध्ये तुरीचे क्षेत्र आहे. यंदा पेरणीपासून पाऊस कमी असल्याने पिकाच्या वाढीवर याचा मोठा परिणाम झाला. याचा थेट परिणाम सरासरी उत्पादनावर होणार आहे. सप्टेंबर व आॅक्टोबर महिण्यातील पावसाचे खंड देखील तुरीला बाधक ठरले आहेत. त्यामुळे संरक्षित सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्र वगळता अन्य क्षेत्राता तुरीची वाढ फारसी झालेली नाही. आर्द्रता टिकवून ठेवणाऱ्या जमिनी व्यतिरीक्त अन्य जमिनीत तुरीला वातावरणात थंडी व जमिनीत ओलावा आवश्यक आहे. यंदा मात्र, याचा अभाव असल्याने तुरीच्या सरासरी उत्पादनात किमान २५ ते ४० टक्कयांनी कमी येण्याची भिती निर्माण झालेली आहे.तुरीचे तालुकानिहाय पेरणीक्षेत्रजिल्ह्यात तुरीचे १ लाख ९२ हजार ८१२ हेक्टर पेरणीक्षेत्र आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ८ हजार ३४१ हेक्टर, चिखलदरा २ हजार ८९५, अमरावती ८ हजार ६४०, भातकुली ९ हजार ७५१, नांदगाव खंडेश्वर ९ हजार २१२, चांदूर रेल्वे ७ हजार ५०, तिवसा ४ हजार ९४६, मोर्शी ९ हजार ९०६, वरूड ७ हजार २९७, दर्यापूर १२ हजार १३२, अंजनगाव सुर्जी ६ हजार ९७३, अचलपूर ८ हजार १६, चांदूर बाजार ५ हजार ९१३ व धामणगाव तालुक्यात ८ हजार २०९ हेक्टर क्षेत्र आहे.उत्पादनात घट होण्याची कारणेसुरुवातीला पाऊस उशिरा; नंतर खंड. यामुळे तूर वाढीला पुरेसा कालावधी मिळाला नाहीफुलोºयावर असताना पाऊस नाही, जमिनीत आर्द्रतेचा अभाव, यामुळे झाडे पिवळी पडून फुलोर गळत आहे.सद्यस्थितीत तुरीला आवश्यक असणारी थंडी नाही. त्यामुळे पिकांवर अळी व रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे.या प्रतिकुल परिस्थितीत शेंगा पोचट, दाणा बारीक होणे व किडीमुळे सरासरी उत्पादनात कमी येणार आहे.उपाययोजनातूर फुलोऱ्यांवर व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना संरक्षित सिंचन हवे. १० लिटर पाण्यात २०० ग्रॅम युरीयाची फवारणी करताना यामध्ये ग्रेड-२ ही सुक्ष्मअन्नद्रव्ये १० लिटर पाण्यात ७० ग्रॅम टाकावे किंवा पॉनोफिक्स ४ मिलि टाकावे. तुरीवर ‘मर’ आलेली झाडे उपटूून नष्ट करावी तसेच करप्यासाठी २५ ग्रॅमक कॉपर आॅक्सीक्लोराइड १० लिटर पाण्यात मिसळून व स्टिकर मिसळून प्रामुख्याने खोडांवर फवारणी करावी, असे कृषितज्ज्ञांनी सांगितले.