उपजिल्हा रुग्णालयात सुविधांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:12 IST2021-04-22T04:12:33+5:302021-04-22T04:12:33+5:30
शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात स्थित्यंतर झाले तरी ते नावापुरतेच राहिले. तालुक्यामध्ये एकूण १०४ गावे १ लाख ४५ हजार ...

उपजिल्हा रुग्णालयात सुविधांची वानवा
शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात स्थित्यंतर झाले तरी ते नावापुरतेच राहिले. तालुक्यामध्ये एकूण १०४ गावे १ लाख ४५ हजार १५१ लोकसंख्या आहे. बहुतांश गावांतील व शहरातील नागरिक हे उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात येतात. मात्र, अत्यवस्थ रुग्ण तातडीने अमरावती किंवा नागपूर येथे केेले जातात. उपजिल्हा रुग्णालयात अद्याप व्हेंटिलेटर व अतिदक्षता विभाग
नाही. आता तर कोविड-१९ मध्ये या बाबी अत्यावश्यक ठरत आहेत. यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विजय कळसकर यांना दक्ष नागरिक, मोशी शहर यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी आशिष टाकोडे, निखिल पन्नासे, रूपेश कोडमकर, प्रकाश कांबळे, विकी भुंबर, योगेश भागवत, नीलेश समर्थ, ओमकार फंदे, देवेंद्र समर्थ, शंकर चोरडे, गणेश कावल , नीलेश जावरकर, सलीम पठाण, संजय कांबळे, अनिल जावरकर, शिवा कपिले, नीलेश ठवळी, अविनाश गायकवाड, डॉ. संदीप मैंद आदी उपस्थित होते.