शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
2
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
3
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
4
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
5
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
6
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
7
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
8
IndiGo: पाणी नाही, जेवण नाही, कॅप्टनही गायब; इंडिगोच्या प्रवाशानं काढलेला व्हिडीओ एकदा बघाच!
9
Accident: अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, जळगावची महिला ठार
10
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
11
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
12
Dhurandar Box Office: रणवीर सिंगच्या 'धुरंदर'ने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला! बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
13
Airfares Soar: मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
14
लग्नाचे कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इनमध्ये राहू शकतात; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
15
५३१ धावांचं आव्हान, सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, विंडीजकडून जोरदार पाठलाग, अखेरीस असा लागला निकाल  
16
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
17
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
18
घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, फोटो आला समोर
19
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
20
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना रचला इतिहास!
Daily Top 2Weekly Top 5

क्वारंटाइन सेंटरवर सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST

पाण्याची व्यवस्था असली तरी जेवणाचा डबा घरू बोलावण्याचे फर्मान काढले आहे. यासंबंधी तक्रार केली किंवा त्या गैरव्यवस्थेत, डासांच्या साम्राज्यात क्वारंटाईन होण्यास नकार दिला की, सरळ गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे.

ठळक मुद्देअचलपूर तालुका : पैसे मोजा अन् क्वारंटाइन व्हा; नाही तर शाळेवर जा!

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर नगरपालिका क्षेत्रासह तालुक्यातील क्वारंटाइन केंद्रांवर सुविधांचा अभाव बघायला मिळत आहे.बिछायत केंद्रावरील बेडशीट नसलेल्या मळक्या गाद्या अन् त्यावर तशीच उशी, शाळेत एकच बकेट अन् एकच शौचालय, पाणी प्यायला रांजणाची स्थितीही वेगळी नाही. ना जेवणाची व्यवस्था, ना चहापानाची. पाण्याची व्यवस्था असली तरी जेवणाचा डबा घरू बोलावण्याचे फर्मान काढले आहे. यासंबंधी तक्रार केली किंवा त्या गैरव्यवस्थेत, डासांच्या साम्राज्यात क्वारंटाईन होण्यास नकार दिला की, सरळ गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे.दरम्यान, शाळेत, केंद्रावर आहे ती व्यवस्था मान्य नसेल, तर पैसे मोजा अन् हॉटेलवर क्वारंटाइन व्हा, असा फंडा प्रशासनाने अमलात आणला आहे. पैसे नसतील, तर शाळेवर गुमान क्वारंटाइन व्हा, असा फतवाच यंत्रणेने काढला आहे. यामुळे क्वारंटाइन होऊ इच्छिणाऱ्यांसह त्यांचे पालक चिंताग्रस्त झाले आहेत.क्वारंटाइन केंद्र गावाबाहेर, गर्दीपासून दूर असावे, असे सर्वमान्य संकेत असताना, मध्यवस्तीत, मुख्य रस्त्यालगतची शाळाही क्वारंटाइन केंद्राकरिता घेण्यात आली आहे. त्यापैकी असलेल्या कांडलीत भंसाली कॉन्व्हेंटला साधी कुंपणभिंतही नाही.ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शाळेवर क्वारंटाइन होणाºयाला घरू न बेड, बिछाना आणावा लागत आहे. खोलीत जमिनीवर तेवढी सतरंजी काही ठिकाणी दिली जात आहे. क्वारंटाइन सेंटरवर सॅनिटायझर नाही, साबणही नाही आणि निर्जंतुकीकरणाचा तर येथे नावालाही गंध नाही.

क्वारंटाइन केंद्रे वाढलीअचलपूर नगरपालिका क्षेत्रांतर्गत क्वारंटाइन केेंद्रात वाढ करण्यात आली आहे. म्युनिसिपल हायस्कूलसह कल्याण मंडपमध्येही क्वारंटाइन केंद्र उभारण्यात आले आहे. म्युनिसिपल हायस्कूलवर ३६ बेड आणि कल्याण मंडपम्मध्ये ६४ बेड टाकण्यात आले आहेत. याकरिता शासकीय वसतिगृहातील पलंग आणि बिछायत केंद्रावरील गाद्यांचा वापर करण्यात आला आहे. शहराबाहेर अंजनगाव रोडवर असलेले अग्रसेन भवनही नगर परिषदेने क्वारंटाईन केंद्राकरिता मिळवले आहे. ज्यांना या क्वारंटाइन केंद्रावर राहायचे नाही, त्यांच्याकरिता नगर परिषदेने शहरातील आरवो आणि भवानी हॉटेलवर व्यवस्था केली आहे. पण, हॉटेलवर क्वारंटाइन होणाऱ्यांना त्या हॉटेलचे भाडे मोजावे लागणार नाही.कांडलीकरिता गुलाबबागकांडली ग्रामपंचायतने अचलपूर रोडवरील शहरातील गुलाब बाग पॅलेस क्वारंटाइनकरिता घेतले आहे. ज्यांना गुलाब बागमध्ये क्वारंटाइन व्हायचे आहे, त्यांना तेथे पैसे मोजावे लागत आहेत.क्वारंटाइन केंद्रावर बिछान्यासह जेवणाचे डबे स्वत: आणावे लागतील. शाळेव्यतिरिक्त अन्य खाजगी केंद्रांवर क्वारंटाइन होताना पैसे मोजावे लागणार आहेत.-जयंत बाबरे, गटविकास अधिकारीदेवमाळीकरिता फातिमा कॉन्व्हेंटदेवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत क्वारंटाइनकरिता फातिमा कॉन्व्हेंट अधिग्रहित करण्यात आली आहे. या कॉन्व्हेंटमध्ये क्वारंटाइन होणाऱ्यांना आपल्या घरू नच बिछान्यासह जेवणही आणावे लागत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या