शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

होय साहेब! मी मग्रारोहयोचा मजूर, सांगा माझं काय चुकलं? अडकलेल्या वेतनासाठी कवितेतून मांडली व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 12:26 IST

आमच्या मजुरीकरिता कोणी बोलायला तयार नाही. कधी मिळेल आमची मजुरी, कोणी उचलणार आमचा प्रश्न.. तुम्हीच सांगा साहेब आमचं काय चुकलं? असा प्रश्न त्याने या कवितेतून उपस्थित केलाय.

ठळक मुद्दे१८ कोटींचे वेतन अडकलेल्या आदिवासींची व्यथा, कविता व्हायरल

अमरावती : मेळघाटात मग्रारोहयोचे १८ कोटी रुपये थकित असून मजुरांना अद्याप मजुरी मिळालेली नाही. त्यामुळे, अनेक कुटुंबांचे हाल होत असून एका मजुराने कवितेच्या माध्यमातून शासन, प्रशासनाकडे आपली व्यथा मांडली आहे. ही कविता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर, गोरगरिबांच्या पोटाचा घास अडला असून प्रशासनाला मात्र अजूनही घाम फुटला नसल्याचे संतापजनक चित्र आहे.

होय साहेब! मी मग्रारोहयोचा मजूर.. तुम्ही सांगा साहेब माझं काय चुकलं.. म्हणत मजुराने आपली व्यथा मांडली आहे. कोणी चालीसा वाचत आहे.. कोणी भोंगे काढत आहे.. जाती धर्मात भेदभाव निर्माण होईल, अशा विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडं वेळ आहे; पण आज आदिवासी, शोषित, पीडित, मजुराच्या मुद्द्यावर कोणी बोलायला तयार नाही. सांगा साहेब त्यात आमचं काय चुकलं... असा प्रश्न त्याने या कवितेतून उपस्थित केलाय.

मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील अकुशल मजुरीचे १५ हजार मजूर आहेत. १८ कोटी रुपये अडकले असून काही बँकेचे अकाउंट तर काही शंभर दिवस देयक प्रलंबित आहे. त्यावर कोणी बोलायला तयार नाही... कोणी आवाज उचलणार की आम्ही काम करून चूक केली तुम्ही सांगा साहेब आमचं काय चुकलं...

साहेब तुम्ही मत घेऊन मोठमोठ्या गाडीने हिंडत असून एसी लावून तुम्ही फिरत आहेत. तुमच्या हिश्श्यात विकासनिधी कमी आला की धिंगाणा घालता... आमच्या मजुरीकरिता कोणी बोलायला तयार नाही. कधी मिळेल आमची मजुरी कोणी उचलणार आमचा प्रश्न तुम्हीच सांगा साहेब आमचं काय चुकलं... गटविकास अधिकारी/तहसीलदार यांच्या आदेशाने आम्ही गोठा, सिंचन विहीर बांधकाम केले ... दागिने गहाण ठेवले/बैल जोड्या विकल्या आता काय विकू साहेब तुम्हीच सांगा आमचं काय चुकलं.. असे म्हणत त्याने कवितेच्या माध्यमातून शासनाकडे मजुरीसाठी व्यथा सांगत विनंती केलीये.  

नागपूर आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांचा डेरा

नागपूर येथे मग्रारोहयोचे आयुक्त कार्यालय आहे. तेथे मेळघाटातील आदिवासींच्या या वेतनासंदर्भात महसूल विभाग व पंचायत समिती अंतर्गत असलेल्या मजुराचे तत्काळ वेतन मिळावे, यासाठी प्रशासकीय स्तरावर जोरदार हालचाली सुरू असून त्यासंदर्भात जिल्हा समन्वयक अनंत घुगे, एपीओ आशिष काळे, रुपेश ऑडिओकर, नितीन शिरभाते, राजू धांडे, रवी धांडे, अतुल जयसिंगपुरे, राहुल सेमलकर यासह संबंधित अधिकाऱ्यांनी समस्या व तत्काळ वेतनासाठी तळ ठोकला आहे.

टॅग्स :SocialसामाजिकMelghatमेळघाटLabourकामगार