शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
5
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

कामगार दिन विशेष : बालमजुरी कायदा मालकांच्याच खिशात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 17:00 IST

आर्थिक  परिस्थितीने खचलेल्या कुटुंबांतील चिमुकल्यांच्या गरजेचा फायदा घेऊन तुटपुंज्या पगारावर राबविणाºया मालकांनीच बालमजुरी कायदा गुंडाळला आहे. 14 वर्षांखालील बालकांना कामगार म्हणून नोकरीला ठेवल्यास २० हजार रुपये दंड आणि  तीन महिने शिक्षेची तरतूद कागदावरच आहे़ बालमजुरीविरोधी समितीची धाड पडूनही मालकांना कारवाईची झळही बसलेली नसल्याचेच चित्र आहे.

-  मोहन राऊत

अमरावती -  आर्थिक  परिस्थितीने खचलेल्या कुटुंबांतील चिमुकल्यांच्या गरजेचा फायदा घेऊन तुटपुंज्या पगारावर राबविणा-या मालकांनीच बालमजुरी कायदा गुंडाळला आहे. 14 वर्षांखालील बालकांना कामगार म्हणून नोकरीला ठेवल्यास २० हजार रुपये दंड आणि  तीन महिने शिक्षेची तरतूद कागदावरच आहे़ बालमजुरीविरोधी समितीची धाड पडूनही मालकांना कारवाईची झळही बसलेली नसल्याचेच चित्र आहे. सन १९८६ च्या बालमजुरी निर्मूलन कायद्याला मालकवर्गाने बासनात बांधल्यामुळेच आज बालकामगारदिनाच्या पूर्वसंध्येलाही बालपण कामाच्या ओझ्याखाली दबल्याचे दिसत आहे.जिल्ह्यातील हॉटेलमध्ये, कारखाने, गॅरेज, चहाच्या कॅन्टीनवर मिशीही न फुटलेली मुले मान मोडून काम करताना दिसतात. शाळेची चैन त्यांना परवडणारी नाही.म्हणूनच त्यांना बालपणाच्या पाठीवर कष्टाचे ओझे पेलावे लागत आहे़ पालकांना किमान वेतन मिळाले, तर या कामगार मुलांचे हात कपबशा विसळण्याऐवजी पेन धरतील. सन १९६८ च्या कोठारी आयोगाची राहत्या परिसरातच मुलांना शाळेत घालण्याची सूचना होती. आता प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले असले तरी अनेक मुले या सुविधेपासून वंचित असल्याचे वास्तव आहे़  महागाईची झळ घेतेय बळी१९८३ साली झालेल्या किमान वेतन कायद्यानुसार १००० विटांच्या कामाला ३० रुपये रोजगार दिला जातो़ २५ वर्षांनंतरही या रोजगारात वाढ झालेली नाही़ या कायद्यात काळाच्या ओघात बदल होण्याची नितांत गरज आहे. ३६५ दिवस हमखास कामाची हमी नसलेल्या पालकांना नाईलाजास्तव मुलांना कष्टाचे बालपण द्यावे लागत़े शहरी भागात महागाईची झळ अधिक बसत असल्याने रोजगार आणि गरजा यांचे गणित जुळत नाही़ तुटपुंजा रोजगार, कर्जाचा डोंगर, घराचे भाडे या सगळ्यांची जुळवाजुळव करताना मेटाकुटीला येणाºया कुटुंबातील मुलांना आर्थिक हातभार लावावा लागतो.  कायदाच अडकला चक्रव्यूहात बालमजुरी निर्मूलन कायदाच चक्रव्यूहात अडकल्याची स्थिती आहे. बालमजुरीविरोधात लढणा-या संघटना अचानक भेट देऊन बालमजुरांना मुक्त करतात व संबंधित मालकाविरोधात तक्रार देतात़ परंतु, अल्पवयीन मुलांना नोकरीवर ठेवणाºया मालकावर कारवाईचे घाव बसत नाहीत, हे वास्तव आहे.

टॅग्स :International Workers' Dayआंतरराष्ट्रीय कामगार दिनAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र