वल्लभनगरातील कुंटणखाना उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:14 IST2021-07-27T04:14:25+5:302021-07-27T04:14:25+5:30
अमरावती : अंबानगरीच्या सांस्कृतिक प्रतिमेला छेद देऊ पाहणारी नकारात्मक बातमी समोर आली आहे. सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास ...

वल्लभनगरातील कुंटणखाना उद्ध्वस्त
अमरावती : अंबानगरीच्या सांस्कृतिक प्रतिमेला छेद देऊ पाहणारी नकारात्मक बातमी समोर आली आहे. सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास येथील वल्लभनगर नं. २ परिसरातील एका घरात चालणाऱ्या कुंटणखान्यावर धाड घालण्यात आली. तेथून एका पुरुषासह चार महिलांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पुरुष व महिला या दोन्ही दलालांविरुद्ध पिटा ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. घटनास्थळाहून मोबाईल, रोख असा एकूण १ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. दलाल महिलेव्यतिरिक्त तीन महिलांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखा व खोलापुरी गेट पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. अब्दुल रहीम शेख बब्बू (३५, रा. अकोटफैल, मोमीनपुरा, हमजा प्लॉट, अकोला) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
कैलासनगर येथील एका भाड्याच्या खोलीत चालणाऱ्या कुंटणखान्यावर २१ जुलै रोजी धाड घालून राजापेठ पोलिसांनी एका दलालासह दोन ग्राहकांना अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध पिटा ॲक्ट अन्वये गुन्हादेखील नोंदविण्यात आला. त्याअनुषंगाने पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी अधिनस्थ यंत्रणेला दिशानिर्देश दिले होते. त्यावरून ही मेगा कारवाई करण्यात आली.
वल्लभनगर नंबर २ येथील एका घरी अ. रहिम हा दलाल येथील एका ३५ वर्षीय महिला सहकाऱ्यासह कुंटणखाना चालवत असल्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई यशस्वी करण्यात आली. आठवडाभरातील ही दुसरी कारवाई ठरली.
यांनी केली कारवाई
पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे एसीपी शिवाजी बचाटे, गुन्हे शाखेचे निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या नेतृत्वात सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सीमा दाताळकर, एपीआय शीतल हिरोडे, पीएसआय राजकिरण येवले, एएसआय श्यामसुंदर तायडे, हवालदार राजेश राठोड, अजय मिश्रा, सुधीर गुडधे, गजानन ढेवले, इम्रान सैयद, नीलेश जुनघरे, चेतन कराडे यांनी केली.