महसूलचा ‘केआरए’ आला

By Admin | Updated: October 29, 2016 00:57 IST2016-10-29T00:29:31+5:302016-10-29T00:57:47+5:30

महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन व्हावे,...

The KRA came out of revenue | महसूलचा ‘केआरए’ आला

महसूलचा ‘केआरए’ आला


लासूर स्टेशन : दोन वर्षापूर्वी लग्न झालेल्या महिलेचे पहिले बाळंतपण धावत्या रेल्वेत झाल्याची घटना गुरुवारी रात्री मनमाड-सिकंदराबाद अजिंठा एक्सप्रेसमध्ये लासूर स्टेशन ते औरंगाबाद रेल्वे प्रवासादरम्यान घडली.
विशेष म्हणजे ही
प्रसूती मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमानी यांनी दोन तृतीयपंथीयांच्या मदतीने
केली. सापुतारा एम. आय. डी. सी. मध्ये काम करणाऱ्या या कुटुंबाला धावत्या रेल्वेतच मदतकार्य मिळाल्याने त्यांना गहिवरून आले होते.
हिंगोली जिल्ह्यातील जामडी गावातील एका कुटुंबातील गर्भवती महिला आपल्या पती, सासू, सासरे व अन्य नातेवाईकांसह दिवाळी सणानिमित्ताने गुरुवारी गावाकडे जाण्यासाठी अजिंठा एक्सप्रेसने निघाले होते. दरम्यान, इंजिनपासून क्रमांक दोनच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या सदर गर्भवती महिलेला करंजगाव ते लासूर रेल्वेस्टेशनदरम्यान प्रसूतीवेदना सुरु झाल्या. ही वेळ होती रात्री दहाची. याचवेळी लासूर रेल्वेस्टेशनवर नागपूर-मुंबई नंदीग्राम व अजिंठा एक्सप्रेस यांची क्रॉसिंगची वेळ झाली होती. विशेष म्हणजे या दोन्हीही एक्सप्रेस लासूर येथे दहा वाजून दहा मिनिटांनी पोहचल्या. गर्भवती महिलेला त्रास होत असल्याने गोंधळ निर्माण झाला होता. या घटनेची माहिती रेल्वेचे पॉइंटमन सीताराम पोलके यांनी स्टेशनमास्टर संजय बरनवाल यांना दिली.
बरनवाल यांनी नांदेड नियंत्रण कक्षाला, तर रेल्वे प्रवासी सेनेचे सदस्य मनोज मुथा यांनी रेल्वे प्रवासी सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमानी यांना घटनेची माहिती दिली. सोमानी हे लगेचच रेल्वेस्टेशनवर पोहोचले. बरनवाल यांनी दहा ते पंधरा वेळा फोन करूनदेखील १०८ रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही.

Web Title: The KRA came out of revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.