चाकर्दा येथे कोविड चाचणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:12 IST2021-04-22T04:12:17+5:302021-04-22T04:12:17+5:30

आरोग्य पथकासह पुन्हा पोहोचले आमदार धारणी : तालुक्यातील कोरोना संसर्गामुळे अतिसंवेदनशील झालेल्या चाकर्दा या गावात आमदार राजकुमार पटेल यांनी ...

Kovid test camp at Chakarda | चाकर्दा येथे कोविड चाचणी शिबिर

चाकर्दा येथे कोविड चाचणी शिबिर

आरोग्य पथकासह पुन्हा पोहोचले आमदार

धारणी : तालुक्यातील कोरोना संसर्गामुळे अतिसंवेदनशील झालेल्या चाकर्दा या गावात आमदार राजकुमार पटेल यांनी बुधवारी लागोपाठ हजेरी लावली. मंगळवारी आमदारांनी तहसीलदारांसमवेत गावाची पाहणी केली होती आणि परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आल्यावर आरोग्य पथकाच्या कर्मचाऱ्यांना रुग्णवाहिका घेऊन शिबिर लावण्यास बाध्य केले.

नागरिकांनी अंगावर ताप असल्यास तात्काळ कॅम्पमध्ये येऊन आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन राजकुमार पटेल यांनी केले. गावातील नागरिकांना कोरोना विषयास अनुसरून माहिती दिली. परिस्थिती गंभीर असल्याने आपण सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि रोगाचा उपचार करण्यासाठी समोर यावे, असे

आवाहन त्यांनी केले. आमदारांसमवेत कालू मालवीय , सुरेंद्र देशमुख , अभिजीत राठोड , प्रशांत बारब्दे उपस्थित होते .

Web Title: Kovid test camp at Chakarda