नेरपिंगळाई येथे कोविड केअर सेंटर आजपासून कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST2021-05-05T04:21:23+5:302021-05-05T04:21:23+5:30
अमरावती : मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथे दुसरे कोविड केअर सेंटर बुधवारपासून कार्यान्वित होत आहे. या ठिकाणी कोरोनाग्रस्तांसाठी २५ बेडची ...

नेरपिंगळाई येथे कोविड केअर सेंटर आजपासून कार्यान्वित
अमरावती : मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथे दुसरे कोविड केअर सेंटर बुधवारपासून कार्यान्वित होत आहे. या ठिकाणी कोरोनाग्रस्तांसाठी २५ बेडची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
काही दिवसांपासून शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. यात वरूड, मोर्शी व अन्य तालुक्यांचा समावेश आहे. रुग्णांवर उपचार व विलगीकरणाच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांमध्ये नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्यानुसार धारणी तालुक्यातील चिखली येथे काही दिवसांपूर्वी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. नेरपिंगळाई येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने एका खासगी महाविद्यालयात नवीन कोविड केअर सेंटर सुरू बुधवारी सुरू होत आहे. या ठिकाणी २५ बेडची सुविधा राहील. डॉक्टर व अन्य आरोग्य कर्मचारीसुद्धा नियुक्त केले आहेत.
कोट
कोरोना संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता, नवीन कोविड केअर सेंटर नेरपिंगळाई येथे बुधवारपासून सुरू केले जात आहे. या ठिकाणी बेड, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पुरेसा औषधसाठा व भोजन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी