कोतवाल भरती, ११६ पदांसाठी तब्बल २५११ अर्ज; २७ ऑगस्ट रोजी होणार परीक्षा
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 8, 2023 15:28 IST2023-08-08T15:23:51+5:302023-08-08T15:28:56+5:30
तहसीलस्तरावर प्रक्रिया; अचलपूर, मोर्शी, चिखलदरात सर्वाधिक चुरस

कोतवाल भरती, ११६ पदांसाठी तब्बल २५११ अर्ज; २७ ऑगस्ट रोजी होणार परीक्षा
अमरावती : महसूल यंत्रणेतील शेवटची कडी असलेला कोतवाल गावपातळीवरील महत्वपूर्ण घटक आहे. यासाठी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पदभरती तहसील स्तरावर होत आहे. जिल्ह्यात रिक्त पदांच्या तुलनेत ८० टक्के मर्यादेत पदभरतीला शासन मान्यता मिळालेली आहे. यामध्ये ११६ जागांसाठी तब्बल २५११ अर्ज दाखल झाले आहेत.
इयत्ता चवथी पास ही शैक्षणिक अहर्ता असली तरी यासाठी अनेक पदवीधर उमेदचारांचे अर्ज प्राप्त आहे. यामध्ये मंगळवारी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी संबंधित तहसील कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यावर ११ ऑगस्टपर्यंत आक्षेप नोंदविण्यात येत आहे. २२ ऑगस्टपर्यंत आक्षेप निकाली काढण्यात आल्यानंतर २७ ऑगस्टला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी अध्यक्ष असलेल्या चार सदस्यीय समितीचे गठण करण्यात आलेले आहे व ही सर्व कोतवाल भरती प्रक्रिया यासमितीच्या नियंत्रणात सुरु आहे. जिल्ह्यात कोतवालांचे १४० पदे रिक्त असले तरी शासन मान्यतेनूसार ११६ पदेच भरण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवार हा १८ ते ४० वयोगटातील असावा ही प्रमुख अट आहे