मुख्यमंत्र्यांना पडला कोळी समाजाचा विसर
By Admin | Updated: September 12, 2015 00:14 IST2015-09-12T00:14:38+5:302015-09-12T00:14:38+5:30
कोळी समाजाद्वारे मुंबईत आयोजित मोर्चाच्या वेळी या समाजाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

मुख्यमंत्र्यांना पडला कोळी समाजाचा विसर
पूर्तता नाही : नोकरीत सामावण्याची मागणी
अमरावती : कोळी समाजाद्वारे मुंबईत आयोजित मोर्चाच्या वेळी या समाजाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, अद्यापही या समस्या सोडविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कोळी समाजाच्या मागण्यांची आठवण करून देण्याकरिता कोळी समाजाच्या शिक्षिकेने मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर सोलापूर येथे लोटांगणही घेण्यात आले. यापुढेही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राज्यस्तरीय मागासवर्गीय कृती समितीचे महासचिव उमेश ढोणे यांनी दिला आहे.
मुंबई येथील मोर्चाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोळी समाजाच्यावतीने नेते रमेश पाटील, अनंत तरे, उमेश ढोणे, सतीश काळे, संदीप बगाळे यांनी निवेदन दिले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाजप सरकार कोळी समाजावरील अन्याय दूर करुन जात पडताळणीच्या नावावर कमी केलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना पुन्हा शासकीय नोकरीत सामावून घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यांना त्याचा विसर पडल्याचा आरोप मागासवर्गीय कृती समितीचे महासचीव उमेश ढोणे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने सातत्याने मुख्यमंत्र्यासी भेटुन पत्रव्यवहार करण्यात अले मात्र अद्यापही कार्यवाही झाली नाही. याबाबत राज्यातील कोळी समाज संतप्त असून शासनाबाबत नाराजी व्यक्त करत आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याने जातपळताळणीच्या नावाखाली कमी केलेल्या कोळी समाजाच्या कर्मचाऱ्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही. प्रत्येक जिल्ह्यात नोकरीतून कमी केलेले हजारो कर्मचारी असून त्यांना आता न्याय हवा आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी कोळी समाजाच्या मागण्या मंजूर करुन शासन निर्णय काढावा, अशी मागणी राज्यस्तरीय मागासवर्गीय कृती समितीचे महासचिव उमेश ढोणे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)