शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

मुळाक्षरांपासून गणितीय सूत्रांचे ज्ञान चारोळीतून : यवतमाळच्या शिक्षकाचा अभिनव प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 18:03 IST

विद्यार्थी लेखन व वाचन कौशल्यात प्रगत व्हावा, यासाठी अनेक शिक्षक आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करीत आहेत. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील रामगाव रामेश्वर प्राथमिक शाळेचे प्रयोगशील शिक्षक महादेव निमकर हे चारोळ्यांचा माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे देत आहेत. 

 - वीरेंद्रकुमार जोगी अमरावती : विद्यार्थी लेखन व वाचन कौशल्यात प्रगत व्हावा, यासाठी अनेक शिक्षक आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करीत आहेत. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील रामगाव रामेश्वर प्राथमिक शाळेचे प्रयोगशील शिक्षक महादेव निमकर हे चारोळ्यांचा माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे देत आहेत. महादेव निमकर हे चारोळीच्या माध्यमातून मुळाक्षरे, अंक, इंग्रजी अल्फाबेट, इंग्रजी अंक, गणितीय सूत्र, भौमितीय आकृत्या व परिपाठाचे सूत्रसंचालनदेखील चारोळ्यांच्या माध्यमातून करतात. स्वत:च्या शैलीची माहिती देताना ते मुळाक्षरांचे ज्ञान देण्यासाठी ‘अ’अक्षराचे ज्ञान करून देण्यासाठी पाटावर बस, घे थोडा रस, अ पासून होतो, अननस अननस’ अशा चारोळीचा उपयोग करतात. या माध्यमातून ‘अ अननसाचा’ असे समजवितात. सोबतच अननसापासून रस निघतो. रस पिताना तो आरामात, मजा घेत प्यावा, असेही ते सांगतात. यामुळे एका चारोळीतून अनेक गोष्टी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न त्यांचा असतो.   इंग्रजीचे अंक शिकविताना ‘मोफत म्हणजे फ्र ी, झाड म्हणजे ट्री, इंग्रजीत तीनला म्हणतात थ्री’ या चारोळीचा वापर करतात. यातून इंग्रजीच्या दोन शब्दांसह अंकांचे ज्ञानही मिळते. गणितीय सूत्र शिकविताना ‘किल्ला म्हणजे दुर्ग, आईच्या पायात स्वर्ग, चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग’ अशी चारोळी वापरतात. त्यांनी तयार केलेल्या चारोळ्यांच्या ‘चारोळीतून गुणवत्तेकडे’ पुस्तक प्रकाशित केले आहे. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांना त्यांनी आपल्या पुस्तकाची पहिली प्रती भेट केली असून, त्यांनी त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केल्याचे निमकर यांनी सांगितले. 

राज्यस्तरीय वारीसाठी निवड महाराष्ट्र राज्य विद्या परिषद पुणे यांच्यावतीने दरवर्षी शिक्षणाची वारीचे आयोजन करण्यात येते. ‘अभिजात भाषा चारोळीतून गुणवत्तेकडे’ या त्यांच्या विषयाची निवड करण्यात आली आहे. अमरावती विभागातून राज्यस्तरीय  ‘शिक्षण वारी’करिता निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक भेट देणारे शिक्षक करीत आहेत. 

कविता व चारोळी लिखाणाची आवड असल्याने आपल्या या गुणांचा वापर विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी व्हावा, या विचारांतून या चारोळ्यांची रचना केली. मुख्याध्यापकासह सहकारी शिक्षकांनी उत्साहवर्धन केल्यानेच हा प्रयोग यशस्वी करता आला.- महादेव निमकर,चारोळ्यांतून धडे देणारे शिक्षक

टॅग्स :Amravatiअमरावती