महिलेवर चाकुहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:23 IST2021-02-21T04:23:47+5:302021-02-21T04:23:47+5:30

--------------------------------------------------------- मुलाल हॉकी स्टीकने मारहाण अमरावती : क्षुल्लक कारणावरून फिर्यादी महिलेच्या मुलाला हॉकी स्टीकने मारून जखमी केल्याची घटना राजेंद्र ...

Knife attack on woman | महिलेवर चाकुहल्ला

महिलेवर चाकुहल्ला

---------------------------------------------------------

मुलाल हॉकी स्टीकने मारहाण

अमरावती : क्षुल्लक कारणावरून फिर्यादी महिलेच्या मुलाला हॉकी स्टीकने मारून जखमी केल्याची घटना राजेंद्र कॉलनीत शुक्रवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करीत आहेत.

-----

अश्लील शिवीगाळ

अमरावती : एका महिलेला क्षुल्लक कारणावरून अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची घटना राजेंद्र कॉलनीत घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून एका युवकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करीत आहेत.

-----

सिद्धार्थ क्रीडा मंडळनजीक अवैध दारू जप्त

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी सिद्धार्थ क्रीडा मंडळ येथून १५०० रुपये किमतीची अवैध दारू गुरुवारी जप्त केली. याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा नोंदविण्यात आला. हर्षल ऊर्फ बाबू अमरचंद शेंडे(३०, रा. सिद्धार्थनगर क्रीडा मंडळ) असे आरोपीचे नाव आहे.

Web Title: Knife attack on woman