शाहीन बागच्या धर्तीवर ' वंचित'चे " किसान बाग " आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST2021-02-05T05:25:52+5:302021-02-05T05:25:52+5:30
फोटो मेलवर वंचित नावाने आहे अमरावती : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शाहीन ...

शाहीन बागच्या धर्तीवर ' वंचित'चे " किसान बाग " आंदोलन
फोटो मेलवर वंचित नावाने आहे
अमरावती : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शाहीन बागच्या धर्तीवर किसान बाग आंदोलन बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमारे करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अलिम पटेल यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अन्यायकारक कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली.
वादग्रस्त नवीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलन ला विविध भागातुन मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे. मुस्लिम समाज व संघटनांना सोबत घेऊन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी शाहीन बागच्या शैलीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदाेलकांनी केंद्र सरकारने केलेले अन्यायकारक कृषी कायदे रद्द करण्याची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे. यावेळी आंदोलनात सिध्दार्थ गायकवाड, शैलेश गवई, रवींद्र मेंढे, बाबाराव गायकवाड, हिदायत खान, मोलवी मुज्जलीम इशाऊती, मोलवी अब्दुल्ला इशाऊती, अ. राजिक मिर्जा,रफीक साहब, नजमा काजी, रजिया बाजी, वहिदा नायर, अहफाज खान, यासिर, फैज खान, यासिन खान, शेख इमरान, सैयद साजिद, मोहम्मद साजिद, मुझाम्मील खान, एस के इमरान, इकरम खान, अंकुश वाकपांजर, रमेश आठवले, आनंद इंगळे ,किशोर तायडे, धीरज मेश्राम, दिनेश भोवते, पंकज वानखडे, सुशील बेले,उत्तमराव वासनिक, रवींद्र वाहने, बेबीनंदा लांडगे, हिरू मेंढे आदी सहभागी झाले होते.