गजराजनगरात घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:12 IST2021-04-10T04:12:54+5:302021-04-10T04:12:54+5:30
अमरावती : स्थानिक गजराजनगरात नजीकच्या ठाकूर ले-आऊटमधील सांडपाणी साचत असल्याने डासांसह दुर्गंधी पसरली आहे. परिसरातील नालीचे काम न झाल्याने ...

गजराजनगरात घाणीचे साम्राज्य
अमरावती : स्थानिक गजराजनगरात नजीकच्या ठाकूर ले-आऊटमधील सांडपाणी साचत असल्याने डासांसह दुर्गंधी पसरली आहे. परिसरातील नालीचे काम न झाल्याने ही समस्या उदभवली असून, वारंवार निवेदन देऊनही लोकप्रतिनिधींनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष चालविले आहे.
गत पाच वर्षांपासून गजराजनगरात सांडपाणी साचत असल्याने परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नगरसेविका गंगा अंभोरे यांना मुद्दा निदर्शनास आणून दिल्यानंतरही लक्ष न दिल्याने अखेर महापालिका आयुक्तांना २३ जुलै २०२० रोजी रीतसर नागरिकांच्या स्वाक्षरीने तक्रार देण्यात आली. मात्र, अद्याप समस्या निकाली निघालेली नाही. त्यामुळे एकीकडे कोरोना आणि सारीच्या आजाराने धास्तावलेले नागरिक डासांच्या त्रासाने अधिकच त्रस्त झालेले आहे. या परिसरातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या समस्येबाबत गांभीर्याने विचार करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.