हत्या करुन मृतदेह पाईपमध्ये टाकला

By Admin | Updated: November 8, 2014 00:45 IST2014-11-08T00:45:47+5:302014-11-08T00:45:47+5:30

एका अनोळखी महिलेची निर्घृपणे हत्या करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्येशाने मृतदेह कॅनलच्या पुलाखालील पाईपमध्ये ...

Killed bodies and put them in the pipe | हत्या करुन मृतदेह पाईपमध्ये टाकला

हत्या करुन मृतदेह पाईपमध्ये टाकला

तळेगाव दशासर : एका अनोळखी महिलेची निर्घृपणे हत्या करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्येशाने मृतदेह कॅनलच्या पुलाखालील पाईपमध्ये ठेवल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजता तळेगाव-देवगाव मार्गावरील कॅनलजवळ घडली.
पोलीस सूत्रानुसार, तळेगाव- देवगाव मार्गावर कॅनलच्या पुलाखालील पाईपमध्ये शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेच्या अंगावरील मास जळाले असून अर्धा पाय, हाडे व कवठी केवळ दिसत होती. हाडाजवळ प्लॅस्टीकची लाल रंगाची अर्धवट जळालेली बांगडी व पितळी बांगड्या, गळ्यात मेटलची पोथ असल्याचे पोलीसांना दिसून आले. घटनेची माहिती मिळताच तळेगावदशासर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवूून घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी तळेगावदशासर पोलीसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधीक तपास े ठाणेदार गोरखदिवे करीत आहे. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी किरण धोटे, धामणगावचे ठाणेदार, सुनील जाधव, गिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सदर महिलेची ओळख वृत्त लिहेस्तोवर पटायची होती. सदर घटनेच्या अनुषंगाने कुणालाही काही उपयुक्त माहिती असल्यास त्यांनी तळेगावदशासर पोलीस ठाणे किंवा स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर )

Web Title: Killed bodies and put them in the pipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.