अपंग तरुणाच्या न्यायासाठी बच्चू कडूंचा बिझिलँडवर ‘प्रहार’

By Admin | Updated: September 13, 2016 00:25 IST2016-09-13T00:25:20+5:302016-09-13T00:25:20+5:30

गतवर्षी बिझिलँडमध्ये काम करताना अपघात होऊन कायम अपंगत्व आलेल्या तरुणाच्या न्यायासाठी...

Kidwai's Kadoo's 'Prahar' on Bizland | अपंग तरुणाच्या न्यायासाठी बच्चू कडूंचा बिझिलँडवर ‘प्रहार’

अपंग तरुणाच्या न्यायासाठी बच्चू कडूंचा बिझिलँडवर ‘प्रहार’

संचालकाला खडसावले : त्वरित नुकसान भरपाई देण्याचे व्यापाऱ्यांचे आश्वासन
नांदगाव पेठ : गतवर्षी बिझिलँडमध्ये काम करताना अपघात होऊन कायम अपंगत्व आलेल्या तरुणाच्या न्यायासाठी आ.बच्चू कडू यांनी शुक्रवारी बिझिलँडवर धडक दिली. नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बिझिलँडच्या संचालकांना खडसावल्यानंतर त्यांनी त्वरित नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले.
येथील दिनेश शेंडे नामक कामगार बिझिलँड कन्स्ट्रक्शन येथे कार्यरत होता. गतवर्षी स्लॅबवरून पडून तो जखमी झाला व त्याला कायमचे अपंगत्व आले. उपचाराचा खर्च कंपनीने केला. मात्र, त्यानंतर नाममात्र रक्कम देऊन त्या तरूणाची बोळवण करण्यात आली. पुढील खर्च देण्यास संचालकांनी टाळाटाळ केली. त्यामुळे त्या तरूणाने सामाजिक कार्यकर्ते पंकज शेंडे व इतर कार्यकर्त्यांनी याची माहिती आ.बच्चू कडू यांना दिली बुधवारी त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत बिझिलँड गाठले. संचालक श्याम पिंजाणीसह इतर संचालकांना तरुणाच्या अपंगत्वाला जबाबदार ठरवून नुकसान भरपाईस विलंब का, असा सवाल आ.कडूंनी फटकारल्यानंतर संचालकांनी नुकसान भरपाई देणार असल्याचे स्पष्ट केले.
कामगारांच्या भविष्याच्या दृष्टीने संचालकांनी खबरदारीने काम करावे, असा सल्लाही आ. कडू यांनी दिला. दोन दिवसांत संचालक व कंत्राटदार मिळून अधिकाधिक रक्कम देण्याचे आश्वासन श्याम पिंजाणी यांनी उपस्थितांना दिले. यावेळी प्रहारचे छोटूमहाराज वसू, पंकज शेंडे, चंदू खेडकर, किशोर नागपुरे, अमिन यादव, गणेश मुळे, राम चंदेल, संदीप मदनकार, श्याम अकोलकर, किशोर राऊत आदींची उपस्थिती होती.

Web Title: Kidwai's Kadoo's 'Prahar' on Bizland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.