२५ हजार हेक्टरवरील सोयाबीनवर खोडमाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:01 IST2020-08-29T05:00:00+5:302020-08-29T05:01:24+5:30

धामणगाव तालुक्यातील शेतकरी दरवर्षी विविध संकटांना सामोरे जात आहे. कधी अल्प पाऊस तर कधी अधिक पाऊस पडतो मागील वर्षी दिवाळीपर्यंत पाऊस असल्याने सोयाबीनचा दाणा घरी आला नाही. कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दिवाळीही अंधारात गेली होती. यंदा कामनापूर घुसळी, तळेगाव दशासर, काशीखेड पिंपळखुटा, अंजनसिंगी या भागातील शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

Khodmashi on soybean on 25,000 hectares | २५ हजार हेक्टरवरील सोयाबीनवर खोडमाशी

२५ हजार हेक्टरवरील सोयाबीनवर खोडमाशी

ठळक मुद्देपिके सडली : वाढ खुंटली, सर्वेक्षण, मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : तीन वर्षात कमी-अधिक पडणारा पाऊस, त्यात उत्पन्नात होत असलेली तुट अशातच यंदा तालुक्यातील २५ हजार हेक्टरवरील सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याने झाडे पिवळसर पडली. तर झाडांची वाढही खुंटली असल्याने शेतक ऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले आहे.
धामणगाव तालुक्यातील शेतकरी दरवर्षी विविध संकटांना सामोरे जात आहे. कधी अल्प पाऊस तर कधी अधिक पाऊस पडतो मागील वर्षी दिवाळीपर्यंत पाऊस असल्याने सोयाबीनचा दाणा घरी आला नाही. कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दिवाळीही अंधारात गेली होती. यंदा कामनापूर घुसळी, तळेगाव दशासर, काशीखेड पिंपळखुटा, अंजनसिंगी या भागातील शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील सर्वच गावातील शेतकºयांनी आपल्या भागात खोड माशीचा प्रादुर्भाव झाला असल्याच्या तक्रारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला नोंदविल्या आहे. पिपळखुटा येथील भूमिपुत्र शेतकरी स्वयंसहायता बचत गटाचे शेतकरी आपल्या शेतातील सोयाबीनवर आलेल्या या खोडमाशीने करपलेली झाडे घेऊनच तालुका कचेरीवर धडकले. तहसीलदार भगवान कांबळे यांना भेटून आपली कैफियत मांडली आहे. आमदार प्रताप अडसड यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान होत असलेल्या सोयाबीनची पाहणी केली आहे. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या वैज्ञानिक पथक दोन दिवसांपासून तालुक्यातील गावाचा दौरा करीत आहे .यंदा आपल्या घरात पीक येईल उत्पन्न होईल. अशी आशा असताना खोडमाशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांनी पाहिलेले स्वप्न पुन्हा धुळीस मिळण्याची वेळ आली आहे.

शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी विभागाने सांगितलेल्या उपाय योजना राबवाव्यात. सोयाबिन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत.
-अजय तळेगावकर, तालुका कृषी अधिकारी

आमच्या भागातील शंभर टक्के सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकाची वाढ खुंटली. सोयाबीनला शेंगा नाही. त्यामुळे तालुका प्रशासनाची भेट घेऊन कैफियत मांडली. त्वरित भरपाई मिळणे गरजेचे आहे.
-गजानन राऊत,
शेतकरी, पिंपळखुटा

Web Title: Khodmashi on soybean on 25,000 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती