‘खनिकर्म’ उत्पन्नात माघारले ६३ ऐवजी २७ कोटी वसूल : वाळू, खनिज संपदेची बेसुमार चोरी
By Admin | Updated: March 23, 2015 23:53 IST2015-03-23T23:53:53+5:302015-03-23T23:53:53+5:30
महसूल विभागात अतिशय महत्त्वाचा गणल्या जाणाऱ्या खनिकर्म विभागाचे उत्पन्न कमालीचे माघारले आहे.

‘खनिकर्म’ उत्पन्नात माघारले ६३ ऐवजी २७ कोटी वसूल : वाळू, खनिज संपदेची बेसुमार चोरी
गणेश वासनिक ल्ल अमरावती
अमरावती: महसूल विभागात अतिशय महत्त्वाचा गणल्या जाणाऱ्या खनिकर्म विभागाचे उत्पन्न कमालीचे माघारले आहे. यंदा २६ कोटी रुपयांच्या उत्पन्नाने खनिकर्म मागे असून ही बाब पालकमंत्र्यांनी गांभिर्यांने घेतली आहे. नेमके उत्पन्न घसरण्यामागील कारणमिमांसा शोधण्यासाठी पालकमंत्र्यांनी संशोधन सुरु केले आहे.
राज्याचे सावजनिक बांधकाम, पर्यावरण, खनिकर्म राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या गृहजिल्ह्यातच खनिकर्म विभागाचे उत्पन्न माघारल्याने ही बाब ना. पोटे यांच्यासाठी अभ्यास करणारी आहे. गतवर्षी खनिकर्म विभाागचे उत्पन्न ४० कोटींच्या वर पोहचले होते. मात्र, यंदा अचानक उत्पन्नात घसरण कशी झाली? हा प्रकार सर्वांसाठीच धक्का देणारा आहे. खनिकर्म विभागात वाळू, खदान, क्रेशर, विटभट्टी, गौण खनिज दंडात्मक रक्कमेतून येणारी वसूली गृहीत राहते.
२३५ वाळू घाटांचे लिलाव प्रस्ताव फेटाळले
खनिकर्म विभागाने ३६८ वाळू घाटांचे लिलाव करण्यासंदर्भात प्रस्ताव पर्यावरण विभागाला पाठविला होता. मात्र, पाण्याची पातळी, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास लक्षात घेता २३५ वाळू घाटांचे प्रस्ताव पर्यावरण विभागाने नामंजूर केले होते. १३३ वाळू घाटांचे प्रस्ताव मंजूर करीत ८१ वाळू घाटांच्या लिलाव करण्याला मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यापैकी ८६ वाळू घाटांचे लिलाव झाले असून १३ घाटांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.
खनिकर्म विभागावर जेंव्हा लक्ष देण्याची वेळ आली तेंव्हा मार्च महिना आला. उत्पन्नात वाढ व्हायला हवी. उत्पन्न माघारले ही बाब गंभीर आहे. मध्यतंरी काही अधिकाऱ्यांनी यात बदमाशी केल्याची माहिती आहे. या प्रकरणी खोलात शिरुन गैरप्रकार बाहेर काढूच. चालू आर्थिक वर्षात नक्कीच खनिकर्मचे उत्पन्न वाढेल.
-प्रवीण पोटे, खनिकर्म राज्यमंत्री