चंद्रभागा फुगल्याने खल्लारचा संपर्क तुटला
By Admin | Updated: July 28, 2016 00:18 IST2016-07-28T00:18:27+5:302016-07-28T00:18:27+5:30
दर्यापूर तालुक्यातील चंद्रभागा नदीला आलेल्या पूरामुळे खल्लार गावाचा संपर्क तुटला आहे.

चंद्रभागा फुगल्याने खल्लारचा संपर्क तुटला
दरवर्षीची समस्या : आमदारांकडून ग्रामस्थांना अपेक्षा
खल्लार : दर्यापूर तालुक्यातील चंद्रभागा नदीला आलेल्या पूरामुळे खल्लार गावाचा संपर्क तुटला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चंद्रभागा नदी फुगली आहे.
विशेष म्हणजे येथील पोलीस स्टेशन, बँका, शाळा व बाजारपेठांचे व्यवहार देखील बंद पडले आहेत. खल्लार पोलीस ठाण्याला ६४ गावे जोडलेली असून बँकेत जवळपास १० ते १२ गावांतील ग्रामस्थांचे व्यवहार चालतात. मात्र, पूर परिस्थितीमुळे यासर्व ग्रामस्थांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. खल्लार येथे चंद्रभागा नदीवर बांधलेल्या पुलावरून पाणी वाहून जाणे ही नित्याचीच बाब आहे. येथे दरवर्षी पावसाळ्यात ४ ते ५ वेळा ही परिस्थिती उदभवते. याबाबत ग्रामपंचायतीमध्ये ठराव देखील करण्यात आला. वरिष्ठांकडे याबाबत तक्रार करण्यात आली. मात्र, या समस्येकडे लक्ष देण्यात आले आहे.
मध्यंतरी यासाठी आंदोलने देखील झालीत. मात्र, अद्याप ही समस्या मार्गी लागलेली नाही. यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. (वार्ताहर)