खादीच्या निर्णयाची अंमलबजावणी नाही

By Admin | Updated: July 8, 2016 00:15 IST2016-07-08T00:15:26+5:302016-07-08T00:15:26+5:30

राज्यातील शासकीय निमशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षण संस्थेमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील एक दिवस खादीचे कपडे परिधान करावेत,

Khadi's decision is not implemented | खादीच्या निर्णयाची अंमलबजावणी नाही

खादीच्या निर्णयाची अंमलबजावणी नाही

कृषी विभाग खादी निर्णयापासून अनभिज्ञ : शासनाच्या आदेशाला तिलांजली
शुभम बायस्कार दर्यापूर
राज्यातील शासकीय निमशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षण संस्थेमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील एक दिवस खादीचे कपडे परिधान करावेत, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.
खादीग्राम उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच या उद्योगाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी खादीचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्याला अनुसरून मागील महिन्यात मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागाच्या सचिवांची बैठक झाली.
आठवड्यातील एक दिवस सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे घालावेत, असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मुख्य सचिवाच्या कार्यालयाने ३ जून रोजी लेखी पत्र पाठवून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व विभागांना दिल्यात. सामान्य प्रशासन विभागाचे अपर सचिव पी. एस. मीना यांनी त्या संबंधीचे परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार राज्यातील शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षण संस्थांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस खादीचे कपडे परिधान करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु दर्यापूर तालुक्यात त्याची कुठल्याच विभागात प्रभावी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही.

दर्यापूर तहसीलमध्ये सोमवार खादीचा दिवस
तहसीलदार राहुल तायडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, तहसीलचा सोमवार हा दिवस खादीसाठी राखून ठेवला आहे. पण सोमवारी कार्यालयात खादी परिधान केलेले कुठलेच अधिकारी आढळून आले नाही. यावरून या निर्णयाची तालुक्यात कितपत अंमलबजावणी होत आहे हे स्पष्ट होते.

खादी अनिवार्य
ज्या विभागाला गणवेश संहिता आहे अशा विभागांनाही खादीचा एक दिवस पाळणे अनिवार्य आहे. परंतु प्रत्यक्षात तसे विभागही खादी घालताना दिसत नाही. त्यामुळे हा निर्णय कागदावरच राहील, असे दिसत आहे.

कृषी विभाग खादी निर्णयाबद्दल अनभिज्ञ
खादी निर्णयाबद्दल तालुका कृषी अधिकारी विनोद लंगोट यांच्याशी संपर्क करून त्याबद्दल विचारणा केली असता ते म्हणाले, तशी कुठल्याच प्रकारची माहिती आम्हाला प्राप्त झालेली नाही. तशाप्रकारची माहिती प्राप्त होताच त्या नियमाचे पालन करण्यास तत्पर आहोत, असे ते म्हणाले.

Web Title: Khadi's decision is not implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.