गावगुंडांना धडा शिकविण्यासाठी केशव कॉलनीचे नागरिक एकवटले
By Admin | Updated: October 2, 2016 00:14 IST2016-10-02T00:14:35+5:302016-10-02T00:14:35+5:30
येथील वाघ्र प्रकल्पासमोरील कॉलिटी कमर्शियल कॉम्पलेसमधील एका वाईन शॉपीमधून दारू विकत घेऊन शहरातील एकत्र आलेले गावगुंडे यथेच्छ दारू ढोसतात.

गावगुंडांना धडा शिकविण्यासाठी केशव कॉलनीचे नागरिक एकवटले
यवतमाळ : खुनाच्या गुन्ह्यात न्यायाधीन बंदी म्हणून जिल्हा कारागृहात असताना मृत्यू पावलेल्या कैद्याच्या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी केली जात आहे.
नरेश किसन आत्राम (२०) असे मृताचे नाव आहे. वडगाव जंगल पोलीस ठाण्यात १३ जुलै २०१५ रोजी नरेशवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून नरेश न्यायालयीन कोठडी अंतर्गत जिल्हा कारागृहात बंदीस्त होता. २२ सप्टेंबर रोजी प्रकृती बिघडल्याने नरेशला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वडगाव रोड पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान शासनाच्या स्थायी आदेशानुसार या न्यायाधीन बंद्याच्या मृत्यूचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे. सीआयडीचे येथील पोलीस उपअधीक्षक सोमेश्वर खाटपे या गुन्ह्याचा तपास करीत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
डझनावर गुन्हे
सीआयडीच्या यवतमाळ युनिटकडे डझनावर गुन्ह्यांचा तपास आहे. कामाचा ताण वाढल्याने दोन गुन्हे वाशिम-अकोल्याकडे वर्ग करण्यात आले. गेली काही दिवस तपासाला अधिकारीच नसल्याने सीआयडीकडे प्रकरणे तुंबली. जुनेच गुन्हे मार्गी लागत नसताना न्यायाधीन बंद्याच्या मृत्यूचा तपासही आल्याने सीआयडीकडील गुन्ह्यांची गर्दी आणखी वाढली आहे.