अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:01 IST2020-04-29T05:00:00+5:302020-04-29T05:01:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धारणी : कोरोना संसर्गाच्या अनुषांगाने मेळघाटातील परिस्थिती सांभाळण्यासाठी सर्व कर्मचाºयांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असताना, काही कर्मचारी ...

अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर करडी नजर
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : कोरोना संसर्गाच्या अनुषांगाने मेळघाटातील परिस्थिती सांभाळण्यासाठी सर्व कर्मचाºयांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असताना, काही कर्मचारी अमरावती, परतवाड्याहून अप-डाऊन करीत असल्याचे तक्रार आहे. त्या अनुषंगाने पोलिसांना तपासणी नाक्यावर अशा कर्मचाºयांची सर्वंकष तपासणी करण्याचे आदेश दिल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मिताली सेठी यांनी दिली.
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातील आढावा बैठकीत मुख्यालयी न राहणाºयांना शो-कॉज देण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने सेठी यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला.
धारणीतील कृषिउत्पन्न बाजार समितीच्या पूर्वेला असलेला तपासणी नाका आणि दक्षिणेला असलेल्या कुसुमकोट फाट्यावरील तपासणी नाक्याहून शासकीय कर्मचाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सेठी यांनी दिली. मेळघाटातील पाणीपुरवठा योजना विजेच्या कमी दाबामुळे अयशस्वी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वीज समस्या दूर करण्यासाठी पाच कोटींची विशेष निधी प्राप्त होणार आहे. त्या निधीतून महावितरणकडून आणखी एक नवीन फीडर निर्माण करण्यात येणार आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी तहसीलदार अतुल पाटोडे आणि गटविकास अधिकारी महेश पाटील उपस्थित होते.
ग्रामस्तरावर समित्या
मेळघाटात कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी ग्रामस्तरावर समित्या नेमण्यात आल्या आहेत. त्या समितीच्या माध्यमातून गावातील प्रत्येक समस्येवर निदान करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे . विशेषत: गोरगरिबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची कमतरता होऊ नये, यासाठी पुरवठा विभाग अहोरात्र प्रयत्न करीत आहे. काही ठिकाणी धान्य वितरणात अनियमितता आढळून आली असून, अशा लोकांची चौकशी करून कारवाई करण्यात आलेली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.