कविठा बु. येथील स्वस्त धान्य दुकान चालवण्यास द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:16 IST2021-09-15T04:16:27+5:302021-09-15T04:16:27+5:30
फोटो एस- १५ सप्टेंबर कविठा अचलपूर : तालुक्यातील कविठा बु. येथील रमाबाई बहुउद्देशीय महिला मंडळाला स्वस्त धान्य दुकान चालविण्याकरिता ...

कविठा बु. येथील स्वस्त धान्य दुकान चालवण्यास द्या
फोटो एस- १५ सप्टेंबर कविठा
अचलपूर : तालुक्यातील कविठा बु. येथील रमाबाई बहुउद्देशीय महिला मंडळाला स्वस्त धान्य दुकान चालविण्याकरिता देण्याची मागणी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
रमाबाई बहुउद्देशीय महिला मंडळाला मिळालेले हे दुकान परवाना रद्द न करता ते रमाबाई बहुउद्देशीय महिला मंडळाला चालविण्यास दिल्यास कविठा बु. येथील शिधापत्रिकाधारकांची गैरसोय थांबेल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना रमाबाई बहुउद्देशीय महिला मंडळाच्या अध्यक्ष निर्मला मनवरे, रजनी मनवरे, संगीता मनवरे, सुषमा इंगळे, वच्छला इंगळे, लता मनवरे, दुर्गा मनवरे, शोभा इंगळे, संगीता इंगळे, भारती इंगळे, उज्ज्वला इंगळे, सीमा सदांशिव, पंचफुला मनवरे उपस्थित होत्या.
140921\img-20210913-wa0069.jpg
कविठा बुजरूक येथिल रास्त भाव दुकान