शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी कथ्थक नृत्याविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 10:25 PM

येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या बाराशेहून अधिक विद्यार्थिनी एकाच मंचावरून कलांजली एक अद्भूत कथक नृत्याविष्कार गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी सादर करणार असल्याची माहिती मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली.

ठळक मुद्देस्कूल आॅफ स्कॉलर्स सज्ज : बाराशे विद्यार्थिनींचा सहभाग

आॅनलाईन लोकमतअमरावती : येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या बाराशेहून अधिक विद्यार्थिनी एकाच मंचावरून कलांजली एक अद्भूत कथक नृत्याविष्कार गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी सादर करणार असल्याची माहिती मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली.राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्था नागपूरद्वारा संचालित स्कूल आॅफ स्कॉलर्स अमरावतीतर्फे ६ जानेवारी रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात सायंकाळी साडेपाच वाजता गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या बाराशेहून अधिक विद्यार्थिनी एकाच मंचावरून २० मिनिटांच्या ठराविक कालावधीत कथक नृत्याविष्कार सादर करणार असल्याची माहिती देण्यात आली. या कथक नृत्याविष्कारात केवळ विद्यार्थिनींचाच सहभाग असणार आहे. आंतरराष्टÑीय स्तरावर विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, त्यांच्यात कलारूची वाढावी या उद्देशातूनच आम्ही कथक नृत्याविष्काराची निवड केली आहे.मागील दोन वर्षांपासून आमची संस्था यासाठी काम करीत आहे. इयत्ता १ ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनी नृत्य करणार आहेत. शाळेचे नृत्य, संगीत, क्रीडा, चित्रकला आणि गणित विभागाचे शिक्षक या अद्भूत कथक नृत्याविष्काराच्या तयारीला लागले आहे. संपूर्ण जगात हा विश्वविक्रम पोहोचावा, त्याचे धाडस आमच्या संस्थेकडून केवळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी करण्यात येत आहे. संस्कृत, गणित, खेळ, नृत्य या सर्वांची सांगड घालणारा तसेच विद्यार्थ्यांच्या एकूणच गुणांमध्ये भर घालणारा आविष्कार आम्ही सादर करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.पत्रपरिषदेला संचालिका आभा मेघे, प्राचार्य सुरेश लकडे, उपप्राचार्य समिधा नाहर, नीलय वासाडे, विशाल चव्हाण आदी उपस्थित होते.