शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जापायी मुलगा गेला.. तरीही कर्ज कायमच!

By admin | Updated: December 21, 2014 22:52 IST

गेल्यावर्षी लहान मुलाने शेतीवरच्या कर्जापायी आत्महत्या केली. शासनातर्फे एक लाखाची मदत मिळाली; तथापि कर्जाची रक्कम कायम होती. मोठ्या मुलाने पुण्यातील एका कारखान्यात रात्रंदिवस

मोर्शी : गेल्यावर्षी लहान मुलाने शेतीवरच्या कर्जापायी आत्महत्या केली. शासनातर्फे एक लाखाची मदत मिळाली; तथापि कर्जाची रक्कम कायम होती. मोठ्या मुलाने पुण्यातील एका कारखान्यात रात्रंदिवस नोकरी करुन कर्ज फेडले. मात्र, अतिश्रमामुळे त्याला रक्तदाबासह कंबरेच्या हाडाचा आजार बळावला आणि त्याला नोकरी सोडावी लागली. ही परिस्थिती आहे नजीकच्या पार्डी या गावातील रुपेश विकासराव मोंढे या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची. विकास मोंढे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वडिलांचे नाव आहे. त्यांचेकडे साडेतीन एकर शेत आहे. विकासराव यांच्यावर आता पावेतो दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्यामुळे त्यांचेकडून शेतीचे काम होत नाही. विकासरावांना दोन मुले आहेत. लहान रुपेश हा शेती पाहत होता. शेती लहान्याने सांभाळली. शिवाय अवघ्या साडेतीन एकरावर कुटूंबाचा उदरनिर्वाह होवू शकत नाही, या भावनेने मोठा मुलगा पंकज याने पुण्यातील एका कारखान्यात नोकरी स्वीकारली होती. पार्डी शिवारात असलेल्या शेती पिकावर जंगली जनावरांचा होणारा प्रादूर्भाव रोखण्याकरिता या कुटुंबाने शेतीला तारेचे कंपाऊंड भरले. त्यासाठी त्यांनी स्थानिक बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेतून कर्ज घेतले होते. शिवाय पीक कर्जही होते. सातत्याने नापिकीमुळे ते कर्ज परतावा करु शकले नाही. त्यांचेकडे १ लक्ष ८८ हजार रुपये व्याजासह थकीत होते. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पीक हातचे गेले. त्यातच बँकेच्या कर्जाचे ओझे असल्यामुळे त्रस्त होऊन त्याने २५ आॅगस्ट २०१३ ला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची नोंद महसूल विभागात झाली. तपासणीअंती ही आत्महत्या पात्र समजण्यात आली. ३० हजार रूपये रोख आणि ७० हजार रुपयांचे बचत प्रमाणपत्र रूपेशच्या वडिलांच्या नावाने काढण्यात आले. रुपेशचा जीव गेला असला तरी कर्ज मात्र फिटले नव्हते. आत्महत्येची धग काही अंशी कमी होताच कर्ज परताव्याकरिता बँकेचे अधिकारी या कुटूंबाकडे जावू लागले. वडीलोपार्जीत शेत जमीन वाचविण्याकरीता पुण्यातील कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत रुपेशचा मोठा भाऊ पंकजने कंबर कसली. दोन पाळयात काम करुन त्याने बँकेचे कर्ज तडजोड करुन फेडले. मात्र, तब्येतीमुळे त्याची नोकरी गेली. यावर्षी विकासरावांनी शेत नातेवाईकाला पेरण्याकरिता दिले. सर्व खर्च या नातेवाईकांनी केला. साडेतीन एकरात कपाशी पेरली. परंतु पावसाच्या अनियमिततेमुळे आतापर्यंत ४ क्विंटल कापूस हाती आला आहे. त्यातही नातेवाईकांचा हिस्सा पडणार आहे.