कन्हान रेतीची अवैध वाहतूक करणारे सहा ट्रक पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2017 00:10 IST2017-05-27T00:10:23+5:302017-05-27T00:10:23+5:30

वाळूची क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करणारे सहा ट्रक तिवसा पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

Kanhana seized six trucks carrying illegal transport of sand | कन्हान रेतीची अवैध वाहतूक करणारे सहा ट्रक पकडले

कन्हान रेतीची अवैध वाहतूक करणारे सहा ट्रक पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : वाळूची क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करणारे सहा ट्रक तिवसा पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई तिवसा ठाण्याचे परीविक्षाधिन आयपीएस अधिकारी विजयकृष्ण यांनी मोझरीनजीक गुरुवारी मध्यरात्रीनंतर करण्यात केली.
रात्रीच्या वेळी वाळूची वाहतूक करता येत नाही. मात्र ट्रक क्रमांक एमएच २७ एक्स ७५९९, एमएच २७ एक्स ८८८५, एमएच ४० एन ५७९९, एमएच २७ एक्स ८८८६, एमएच ३० एबी १४०६ व एमएच एक्स ५३२७ हे रात्रीच्या वेळी क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. नियम तोडून रेती वाहतूक केली जात असल्याने त्यांना ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती महसूल व आरटीओंना दिल्याचे एपीआय किरण कांबळे यांनी सांगितले.

Web Title: Kanhana seized six trucks carrying illegal transport of sand