कन्हान रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक पकडले
By Admin | Updated: June 1, 2017 00:17 IST2017-06-01T00:17:49+5:302017-06-01T00:17:49+5:30
येथील पोलीस ठाण्यात गत दोन महिन्यांपासून रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडक कारवाई सुरू आहे.

कन्हान रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक पकडले
पाच आरोपी ताब्यात : तिवसा पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : येथील पोलीस ठाण्यात गत दोन महिन्यांपासून रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडक कारवाई सुरू आहे. सोमवारी मध्यरात्री रेतीची अवैध वाहतूक करणारे पाच ट्रक पकडले. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील कन्हान नदीच्या घाटावरून रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा करून अवैध वाहतूक केली जाते. अशी वाहतूक करणारे एम.एच. बी.डी. ९९२२, एम.एच.एक्स. ६०००, एम.एच. एक्स.८०००, एम.एच. बी.डी. ९९९१, एम.एच.एक्स. ७७०० ह्या क्रमांकाचे पाच ट्रक तिवसामार्गे अमरावतीला जात असताना आयपीएस अधिकारी विजय कृष्ण यांनी पकडले. यात अब्दुल राजिक शेख इस्लामाईल (४४), शेख आशिफ शेख बिस्मिल्ला (३२), मोहम्मद रिजवान मोहम्मद इलियाज (२५), मोहम्मद नवशाद मोहम्मद इशाद (२१) व शेख रहीम शेख कालु (४९) सर्व राहणार अमरावती यांना ताब्यात घेतले आहे.
ट्रक ताब्यात घेतल्याची माहिती तिवसा महसूल विभागाला देण्यात आली आहे. रॉयल्टी नसल्यास व तपास केल्यानंतर अवैध रेती आढळल्यास चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल
- किरण कांबळे
सहायक पोलीस निरीक्षक, तिवसा