पोलिसांच्या प्रयत्नाने काळवीटला जीवदान

By Admin | Updated: May 30, 2016 00:33 IST2016-05-30T00:33:34+5:302016-05-30T00:33:34+5:30

नया अमरावती रेल्वे स्थानकाजवळ श्वानाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काळवीटला पोलिसांनी जीवदान दिले.

Kalichala Lived by police efforts | पोलिसांच्या प्रयत्नाने काळवीटला जीवदान

पोलिसांच्या प्रयत्नाने काळवीटला जीवदान

बघ्यांची गर्दी : निसर्ग प्रेमाचा असाही अनुभव
अमरावती : नया अमरावती रेल्वे स्थानकाजवळ श्वानाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काळवीटला पोलिसांनी जीवदान दिले. शनिवारी सायंकाळी पोलीस गस्तीवर असताना चार ते पाच श्वान हे काळवीटचे लचके तोडत असल्याचे निदर्शनास आले होते. पोलिसांचे निसर्ग प्रेम जागृत झाल्याने जखमी काळवीटला जीवदान मिळाल्याची चर्चा वनविभाग वर्तुळात होती.
राजापेठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी शनिवारी आकोली मार्गावर गस्त घालत असताना त्यांना रेल्वे स्थानकाजवळील मोकळ्या परिसरात काही श्वान काळविटवर हल्ला करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ धाव घेऊन श्वानाना हाकलून लावले. या हल्लात गंभीर जखमी झालेला काळविट अत्यवस्थेत पडून होता. त्यामुळे पोलिसांचे निसर्गप्रेम जागृत होऊन त्यांनी तत्काळ वनविभागाचा सपर्क क्रमांक शोधण्यास सुरुवात केली. दरम्यान जखमी काळवीटला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. त्याचवेळी त्या मार्गाने जाणारे समाजसेवक सोमेश्वर पुसतकर याच्या ही बाब लक्षात आली. त्यामुळे त्यांनीही वनविभागाशी सपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु केलेत. मात्र, वनविभागाचा फोन क्रमांक वेळेवर उपलब्ध न झाल्याने त्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्याशी सपर्क केल्याची माहिती वनविभाग सुत्रांनी दिली. त्यांनी एका पत्रकाराचे नाव सुचवून सपर्क करण्याचे सांगितले. तेव्हा पुसतकर यांनी त्या पत्रकाराशी सपर्क करून वनविभागाला माहिती देण्यास सांगितले.

Web Title: Kalichala Lived by police efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.