मोर्शी येथे कबड्डी सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:22 IST2021-02-18T04:22:10+5:302021-02-18T04:22:10+5:30

बहुउद्देशीय मंडळाने या सामन्यांचे आयोजन केले होते. नगराध्यक्ष मेघना मडघे यांनी पारितोषिक विरतण केले. द्वितीय पारितोषिक ११ हजार रुपये ...

Kabaddi matches at Morshi | मोर्शी येथे कबड्डी सामने

मोर्शी येथे कबड्डी सामने

बहुउद्देशीय मंडळाने या सामन्यांचे आयोजन केले होते. नगराध्यक्ष मेघना मडघे यांनी पारितोषिक विरतण केले. द्वितीय पारितोषिक ११ हजार रुपये पंचरत्न क्रीडा मंडळ व तृतीय पारितोषिक गाडगेबाबा क्रीडा मंडळ (अमरावती) सात रुपये हितेश उपासे यांच्यातर्फे देण्यात आले. याप्रसंगी येरला येथील उपसरपंच स्वप्निल चौधरी व ग्रामसेवक राजू ठाकरे यांचा नगराध्यक्ष मडघे यांनी सत्कार केला. आयोजनाबाबत नगरसेवक हर्षल चौधरी यांना पंचरत्न क्रीडा मंडळाच्या वतीने शिवप्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. माजी कृषिमंत्री अनिल बोंडे, नगर परिषद उपाध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, डॉ. वसुधा बोंडे, माजी उपाध्यक्ष मोहन मडघे, कमलसिंह चितोडिया, सुनील ढोले, भूषण कोकाटे, नगरसेवक रवि गुल्हाने, दीपक नेवारे, सुनील कोहळे, सुनीता कोहळे, प्रीती देशमुख, वैशाली भूषण कोकाटे, क्रांती चौधरी आदी उपस्थित होते. दिलीप नेरकर, किशोर गावंडे, सतीश डफळे, संजय चौधरी, श्रीकांत देशमुख, गिरीश टोपरे, संजय ठाकरे, अनिल जावळे, आनंद सदातपुरे, शेरा भाई, गोलू गोधनकर, मनीष वयले यांनी पंचगिरी केली.

Web Title: Kabaddi matches at Morshi