‘न्याय आपल्या दारी, न्याय सर्वांसाठी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:21 IST2017-11-28T00:19:41+5:302017-11-28T00:21:17+5:30
महाराष्टÑ राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी ९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय विधी सेवा दिवस पाळणे व त्या अंतर्गत ९ ते १८ नोव्हेंबर दरम्यान विविध उपक्रम राबविण्याचे दिशानिर्देश दिले होते.

‘न्याय आपल्या दारी, न्याय सर्वांसाठी’
आॅनलाईन लोकमत
अमरावती : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी ९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय विधी सेवा दिवस पाळणे व त्या अंतर्गत ९ ते १८ नोव्हेंबर दरम्यान विविध उपक्रम राबविण्याचे दिशानिर्देश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक जिल्हा व सत्र न्यायालयस्थित जिल्हा विधिसेवा प्राधिकरणतर्फे विविध उपक्रम राबवित शहरातून गुरुवारी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
सप्ताहांतर्गत चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे, न्यायालयीन परिसरात शासकीय योजनांचे चित्रफितद्वारे प्रसारण, घरोघरी जाऊन विधी सेवा योजनांचा प्रचार व प्रसार असे उपक्रम राबविण्यात आले. 'सर्वांसाठी न्याय योजना व न्याय आपल्या दारी' या बाबींची पूर्तता करण्याच्या उद्देशाने तसेच लोकांना योजनांची माहिती व पात्र लोकांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी महाराष्टÑ राज्य विधी सेवा प्राधिकरणद्वारा निर्गमित उपक्रमांचे आयोजन प्राधिकरणाद्वारे करण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव व्ही. के. देशमुख, यांनी हिरवी झेंडी दाखवून जिल्हा व सत्र न्यायालय परिसरातून रॅलीस सुरुवात झाली. पुढे गर्ल्स हायस्कूल चौक, इर्विन चौक, जयस्तंभ चौक, श्याम चौक, राजकमल, हमालपुरा, काँग्रेसनगर, सुंदरलाल चौकमार्गे परत जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात रॅलीची सांगता झाली. रॅलीत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमरावती तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अनिल पानसरे, प्राधिकरणाच्या सचिव व्ही. के. देशमुख व अमरावती न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा शासकीय अभियोक्ता परीक्षित गणोरकर व इतर अभियोक्ता वर्ग, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे व अधिवक्ता मंडळी, न्यायालयीन कर्मचारी सहभागी झाले होते. प्राधिकरणामार्फत चालविल्या जाणाºया विविध सेवा योजना, समाजातील दुर्बल व गरजू लोकांकरिता उपलब्ध असलेल्या उपक्रमांची माहिती, लोकन्यायालयाचे महत्त्व तसेच ‘न्याय आपल्या दारी व न्यास सर्वांसाठी’ हा संदेश प्रस्तुत रॅलीद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्यात आला.