न्यायमंत्री रमले वझ्झरच्या मतिमंदासोबत

By Admin | Updated: August 12, 2015 00:20 IST2015-08-12T00:20:01+5:302015-08-12T00:20:01+5:30

राज्याचे सामाजिक व न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी सायंकाळी ५ वाजता वझ्झर येथील स्व. अंबादासपंत ...

With Justice Minister Ramle Wazhar's Marthand | न्यायमंत्री रमले वझ्झरच्या मतिमंदासोबत

न्यायमंत्री रमले वझ्झरच्या मतिमंदासोबत

व्यथा जाणल्या : स्फूर्तिगीतही गायिले ‘इतनी शक्ती हमे देना दाता...!’
अचलपूर : राज्याचे सामाजिक व न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी सायंकाळी ५ वाजता वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मूकबधिर व मतिमंद बालगृहाला भेट दिली. अर्धा तासापेक्षा अधिक वेळ त्यांनी मतिमंद अंध मूकबधिर असलेल्या मुला-मुलींसोबत घालविला. संपूर्ण परिसराची पाहणी करून आस्थेने समस्यांची विचारपूस सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले केली. त्यांच्या या अचानक भेटीने सर्व भारावून गेले.
वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतीमंद, अपंग व मूकबधिर बालगृहात सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले जाणार याची पुसटशी कल्पनासुद्धा कुणालाच नव्हती. सोमवारी परतवाडा येथे तीन कोटी रूपये खर्चून ७५ मुलांसाठी उभारण्यात आलेल्या वसतिगृहाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. कार्यक्रम आटोपल्यावर मंत्र्याचा ताफा अचानक वझ्झरच्या दिशेने वळला. परंतु शंभर फूट अंतरावरील ही निवासी शाळा सोडून बडोले यांनी ताफा शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमात नेण्याच्या सूचना केल्यात.

न्यायमंत्र्यांच्या प्रेमाने अधिकारी अवाक
स्वागतासाठी आलेल्या शर्मिली नामक एका अपंग मतिमंद मुलीला राजकुमार बडोले यांनी चक्क कडेवर घेऊन आत आणले. सोबतच्या तिच्या सहकारी मुली काही न समजता या प्रसंगाला मोठ्या कौतुकाने पाहत होत्या. तर मुलीची आस्थेने विचारपूस त्यांनी केली. मंत्र्यांच्या या प्रेमाने उपस्थित अधिकारीही अवाक् झाले.

पान-फुलांनी स्वागत
वझ्झर येथे शंकरबाबा पापळकर यांच्या बालगृहातील मुलांनी झाडांच्या पानासह रानफुलांनी सामाजिक न्यायमंत्री बडोले यांचे स्वागत केले. यावेळी उपविभागीय अधिकारी श्यामकांत मस्के, तहसीलदार मनोज लोणारकर, ठाणेदार गिरीश बोबडे आदी उपस्थित होते. मतिमंद मुला-मुलींनी केलेल्या स्वागताने मंत्र्यांसह उपस्थित भारावून गेले. मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा दिसताच समयसुचकता पाहता हा कार्यक्रम आखला गेला, तसेच आपल्या बालगृहात या मुलांनी टाळ्या वाजवित हसतखेळत त्यांना नेले.

मंत्र्यांनी गायिले स्फूर्तिगीत
‘इतनी शक्ती हमे देना दाता, मनका विश्वास कमजोर होना’, हे स्फूर्तिगीत मतीमंद अपंग मुला-मुलींसह चक्क मंत्री राजकुमार बडोले यांनी गायिले आणि मुलांमध्ये स्फूर्ती चेतविली, त्यानंतर त्यांनी बालगृहाच्या सर्व खोल्यांचे बारीकीने निरीक्षण करीत उपस्थित कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतले.

शंकरबाबा पापळकरांच्या कुटुंबाला भेट दिली. असे कुटुंब आयुष्यात पाहिले नाही. या सर्वांमध्ये कुठेतरी अशी अनामिक शक्ती वावरत असावी. शब्दांच्या पलीकडचेच सारे कौतुक हा शब्द अतिशय तोकडा.काय म्हणावे कळत नाही. सामाजिक न्याय देणी म्हणून माझी पूर्ण शक्ती पाठीशी आहे.
- राजकुमार बडोले,
सामाजिक न्यायमंत्री, महाराष्ट्र.

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अचानक भेटीने वझ्झरसह मतिमंदांची काशी भारावून गेली. त्यांनी आस्थेने केलेली अपंग विद्यार्थ्यांची विचारपूस माझ्या मुलांना न्याय देणारी ठरली. माझ्या मुलांची दखल घेण्यासाठी सर्वांचा पुढाकार ही महत्त्वाची बाब आहे.
- शंकरबाबा पापळकर,
समाजसेवी.

Web Title: With Justice Minister Ramle Wazhar's Marthand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.