जरासा गारवा आम्हालाही...
By Admin | Updated: May 20, 2016 00:11 IST2016-05-20T00:11:02+5:302016-05-20T00:11:02+5:30
उन्हाची दाहकता वाढत चाललीय. आबालवृध्द हैराण झाले आहेत. दिवसभर टिचभर पोटासाठी वणवण भटकंती...

जरासा गारवा आम्हालाही...
जरासा गारवा आम्हालाही... उन्हाची दाहकता वाढत चाललीय. आबालवृध्द हैराण झाले आहेत. दिवसभर टिचभर पोटासाठी वणवण भटकंती करणाऱ्यांनाही उष्मा जाणवतोच ना. त्यात कडेवर हे इवलेसे मूल. आईसक्रीम आणि शीतपेयांचे चोचले यांना परवडणारे नाहीत. मग, गारवा मिळविण्यासाठी या कुटुंबाने स्वस्तातल्या सरबताचा आसरा घेतलाय. कडाक्याच्या उन्हात तेवढाच दिलासा आणखी काय?