शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या दहा मिनिटांच्या पावसाने दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 05:00 IST

शहरात दुपारी ३ च्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला व १० ते १५ मिनिटांत जोरदार हवेसह मान्सूनपूर्व पावसाची एंट्री झाली. अर्धातासपावेतो पावसाचा जोर वाढतच गेला. या पावसाचा दुचाकीस्वारांनी मनसोक्त भिजत आनंद घेतला, तर रस्त्यावरील काही नागरिकांनी आडोसा घेतला. यामध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने गोंधळात भर पडली. शहरातील शासकीय वसाहतीसह काही भागात हवेमुळे झाडे कोसळली. फांद्या तुटून रस्त्यावर, वाहनांवर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिनाभरापासून ४३ ते ४४ अंश तापमानामुळे अंगाची काहिली होत असताना बुधवारी दुपारी ३.२० च्या सुमारास अचानक मान्सूनपूर्व पाऊस कोसळला. वादळाने शहरातील काही भागात वाहनांवर झाडे पडली. बाजार समितीमध्ये विक्रीला आणलेली धान्याची पोती भिजल्याने खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी पावसामुळे सर्वत्र तारांबळ उडाल्याचे दिसून आले.शहरात दुपारी ३ च्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला व १० ते १५ मिनिटांत जोरदार हवेसह मान्सूनपूर्व पावसाची एंट्री झाली. अर्धातासपावेतो पावसाचा जोर वाढतच गेला. या पावसाचा दुचाकीस्वारांनी मनसोक्त भिजत आनंद घेतला, तर रस्त्यावरील काही नागरिकांनी आडोसा घेतला. यामध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने गोंधळात भर पडली. शहरातील शासकीय वसाहतीसह काही भागात हवेमुळे झाडे कोसळली. फांद्या तुटून रस्त्यावर, वाहनांवर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तारांवर फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित झालेला आहे. त्यात नळही येणार नसल्याचे मजीप्राने अगोदरच जाहीर केले असल्याने नागरिकांना अनेक समस्या उद्भवत आहेत.

नियोजनाची पोलखोल  मे महिन्यात महापालिका, महावितरणद्वारा मान्सूनपूर्व कामे करण्यात येतात, किंबहुना आता सुरुवातही करण्यात आलेली आहे. मात्र, उशिराच्या नियोजनाअभावी मान्सूनपूर्व पहिल्याच पावसाने यंत्रणेच्या मान्सूनपूर्व नियोजनाची पोलखोल झाली आहे. विजेच्या तारांवर फांद्या पडल्याने काही भागातील वीजपुरवठा विस्कळीत, खंडित करण्यात आल्याचे दिसून आले.

झाडाखाली वाहने दबलीयेथील जुन्या बायपास मार्गावर असलेल्या शासकीय वसाहतीमध्ये उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फूलझेले यांच्या घरासमोरील मोठी झाडे पडल्याने त्यांच्या स्वत:च्या वाहनासह शासकीय वाहन झाडाखाली दबली गेल्याने वाहनांचे मोठे नुकसान झालेले आहे. यासह शहराच्या आऊटस्कड भागात वादळामुळे झाडे पडली व काही ठिकाणी फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या आहेत.

बाजार समितीत शेतमाल भिजलायेथील बाजार समितीत शेतकऱ्यांनी बुधवारी शेतमाल विक्रीला आणला होता. ही पोती उघड्यावर असल्याने अचानक आलेल्या पावसाने भिजली आहेत. यामध्ये हरभरा, तूर व सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. मार्केट यार्डात व्यापाऱ्यांची पोती असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल ठेवायला जागा नाही. त्यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

टॅग्स :RainपाऊसMarket Yardमार्केट यार्ड