दुचाकीचा आरसा केस विंचरण्यापुरताच?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:17 IST2020-12-30T04:17:17+5:302020-12-30T04:17:17+5:30
( असायमेंट) अमरावती : शहरात हजारो दुचाकी आहेत. त्याला लागलेले आरसे (साईड मिरर) घरी काढून ठेवले जातात. वाहतूक सुरक्षेचे ...

दुचाकीचा आरसा केस विंचरण्यापुरताच?
( असायमेंट)
अमरावती : शहरात हजारो दुचाकी आहेत. त्याला लागलेले आरसे (साईड मिरर) घरी काढून ठेवले जातात. वाहतूक सुरक्षेचे अत्यंत महत्त्वाचे हे साधन दुचाकीलाच ठेवण्याची काळजी ना दुचाकीचालकांना आहे, ना पोलिसांना. शहरात अनेक दुचाकी आरशाविनाच धावत असतात. आरसा नाही म्हणून दुचाकीचालकांवर वर्षभरात वाहतूक पोलिसांनी एकही कारवाई केली नाही, हे विशेष.
शो-रूममधून दुचाकी ग्राहकाला मिळत असताना दोन आरसे देण्यात येतात. दुचाकी चालविताना मागच्या, बाजूच्या वाहनाचे भान असावे, यासाठी दोन्ही बाजूंना आरसे दिले जातात. त्यापैकी निदान दुचाकी चालकाच्या उजव्या हातावरील तरी आरसा असणे बंधनकारक आहे. त्याचे उल्लघंन केल्यास २०० रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. मात्र, अनेक वाहनचालक दुचाकीचा आरसा काढून घरी ठेवतात. अशा वाहनचालकांवर आता तरी पोलीस कारवाई करतील का, हा प्रश्नच आहे.
बॉक्स:
आरसा नाही म्हणून २०० रुपयांचा दंड
दुचाकी किंवा चारचाकी वाहनाला आरसा नसला तर २०० रूपयांच्या दंडात्मक कारवाईची तरतूद असल्याचे सहायक पोलीस आयुक्त ( वाहतूक) राहुल आठवले यांनी सांगितले. मात्र, १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर दरम्यान ११ महिन्यांत आरसा नाही म्हणून एकाही दुचाकीचालकावर कारवाई करण्यात आल्याची नोंद वाहतूक पोलीसदप्तरी नाही.
बॉक्स:
दुचाकीचालकांना हे बंधनकारक
वाहनाची नेमप्लेट स्पष्ट वाचता येईल अशा रीतीने ठेवणे बंधनकारक. वेगमर्यादा पाळावी. धोकादायक रीतीने वाहन चालवू नये. परवाना, इन्श्यूरन्स, पीयूसी व इतर कागदपत्रे बाळगावी. हेल्मेटचा वापर करावा. सिग्नल जम्पिंग तोडू नये. दुचाकीला आरसा असावा.
कोट
ट्रिपलसीट वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, विनापरवाना वाहन चालविणे, सिग्नलचे नियम तोडणे तसेच इतर शीर्षानुसार दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. याशिवाय आरसा नसेल, तर २०० रुपये दंडाची तरतूद आहे. अद्याप कारवाई झालेली नाही. यापुढे त्याकडेही लक्ष दिले जाईल.
- राहुल आठवले, सहायक पोलीस आयुक्त ( वाहतूक) अमरावती