फूस लावून पळविलेली मुलगी अद्यापही बेपत्ता
By Admin | Updated: July 28, 2016 00:07 IST2016-07-28T00:07:47+5:302016-07-28T00:07:47+5:30
इमोशनल ब्लॅकमेलिंग करून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याची घटना नांदगाव खंडेश्वर ठाण्याच्या हद्दीत महिन्याभरापूर्वी घडली.

फूस लावून पळविलेली मुलगी अद्यापही बेपत्ता
पापळ वाढोणा येथील घटना : नांदगाव खंडेश्वर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
अमरावती : इमोशनल ब्लॅकमेलिंग करून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याची घटना नांदगाव खंडेश्वर ठाण्याच्या हद्दीत महिन्याभरापूर्वी घडली. याप्रकरणात नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी आरोपीला पकण्यात अद्यापपर्यंत यश मिळाले नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणा तपासात हयगय करीत असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांचा आहे.
वाढोणा पापळ येथील अल्पवयीन मुलगी ही २० जून रोजी नांदगाव खंडेश्वर येथे शिकवणी वर्गासाठी गेली होती. तेव्हापासून ती बेपत्ता झाली आहे. यासंदर्भात तिच्या नातेवाईकांना नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी अक्षय जनार्धन रोदळेविरुध्द तक्रार नोंदविली आहे. अक्षय याने भावनीक ब्लॅकमेंलिग करून मुलीला पळविल्याचा आरोप नातेवाईकांचा आहे. माझासोबत चल अन्यथा मी आत्महत्या करेल, अशी धमकी देऊन अक्षयने मुलीला पळविल्याचा आरोप नातेवाईकांचा आहे. या घटनेला महिना उलटून गेला आहे. मात्र, पोलिसांचा तपास आरोपीपर्यंत पोहचला नाही, त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नातेवाईकांनी आक्षेप घेतला आहे.
अल्पवयीन मुलगी व आरोपीचा शोध सुरुआहे. त्यांचे मोबाईल बंद असल्यामुळे अद्यापपर्यंत ठावठिकाणा कळू शकले नाही. मात्र, थोडा सुगावा लागल्याने चार ते पाच दिवसात शोध लागण्याची शक्यता आहे.
अमित वानखडे,
पोलीस उपनिरीक्षक, नांदगाव खंडेश्वर