कावीळ : समज-गैरसमज

By Admin | Updated: July 28, 2015 00:43 IST2015-07-28T00:43:09+5:302015-07-28T00:43:09+5:30

दरवर्षी २८ जुलै हा दिवस जागतिक यकृत दाह (ऌीस्रं३्र३्र२) दिवस म्हणून साजरा केला जातो.

Junk: Understanding Myths | कावीळ : समज-गैरसमज

कावीळ : समज-गैरसमज

यकृतदाह रोग : दरवर्षी १४ लाख मृत्युमुखी
अमरावती : दरवर्षी २८ जुलै हा दिवस जागतिक यकृत दाह (ऌीस्रं३्र३्र२) दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरात ४० कोटी लोक कावीळ ‘ब’ व कावीळ ‘क’ या विषाणुमुळे होणाऱ्या आजाराने ग्रस्त आहेत. विषाणुजन्य यकृतदाह रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दरवर्षी १४ लाखावर आहे.
विषाणुजन्य यकृतदाह हा पाच वेगवेगळ्या विषाणुंमुळे होतो. परंतु सर्वसामान्य जनतेमध्ये अजूनही कावीळाबद्दल बरेचसे गैरसमज असून आजच्या या लेखाचा उद्देश लोकांमध्ये गैरसमज दूर करुन त्यांना योग्य माहिती देणे हा आहे.

कावीळ इतर पॅथीच्या उपचारामुळे
होऊ शकतो का ?
बऱ्याच लोकांमध्ये हा प्रचलित गैरसमज असून त्यामुळे बरेच रुग्ण हे शेवटच्या टप्प्यामध्ये दाखविले जातात. ‘अ’ प्रकारचा विषाणुजन्य कावीळ दूषित पाण्यामुळे होणारा आजार असून त्यावर कोणताही उपचार नाही. केवळ यकृताला आराम देणे. आहारातील बदल, आजार गंभीर रुप धारण करत आहे की नाही यावर लक्ष देणे गरजेचे असते. (उदा. काजण्या आणि सर्दी आजाराप्रमाणे) परंतु इतर होणाऱ्या कावीळवर योग्य उपचार करणे हे यकृत (लीवर) च्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

डोळे पिवळे दिसणे हा काय आजार आहे ?
डोळे पिवळे दिसणे हा आजार नसून हे आजाराचे एक लक्षण आहे. कावीळ होण्याची बरीचशी कारणे असतात. रोग्याच्या लक्षणावरून आणि तपासण्यावरून आपल्याला कोणत्या कारणामुळे कावीळ झाला आहे याचा शोध घेऊन उपचार करावा लागतो.

कावीळ होण्याची कारणे
कावीळ हा विषाणू, जिवाणू किंवा परजिविंच्या संसर्गामुळे होऊ शकतो. रक्तपेशी फुटल्यामुळे पित्ताशयाच्या मार्गामध्ये अडथळा किंवा खंड निर्माण झाल्यामुळे काही आनुवंशिक आजारामध्ये तसेच इतर अनेक यासारख्या कारणामुळे होऊ शकतो.

कावीळच्या रुग्णासाठी कोणते खाद्यपदार्थ योग्य?
कावीळचा रुग्ण घरामध्ये बनविणारे सर्व आहार खाऊ शकतो.
डॉ. नरेश तायडे,
कोषाध्यक्ष, भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटना, अमरावती.

लोकमत
दिन विशेष

Web Title: Junk: Understanding Myths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.