कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना पकडले
By Admin | Updated: February 19, 2015 00:20 IST2015-02-19T00:20:26+5:302015-02-19T00:20:26+5:30
इंदिरा आवास योजनेच्या धनादेशाची रक्कम खात्यात जमा करण्यासाठी लाभार्थ्याला दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या चिखलदरा पंचायत समितीच्या ...

कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना पकडले
चिखलदरा : इंदिरा आवास योजनेच्या धनादेशाची रक्कम खात्यात जमा करण्यासाठी लाभार्थ्याला दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या चिखलदरा पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्याला रंगेहात लाच स्वीकारताना पकडल्याची घटना बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. यामुळे पंचायत समितीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अमरावती येथील साईनगर भागातील बेनाम चौकातील मूळचे रहिवासी असलेले चंद्रकांत भगवंतराव जिरापुरे (४६) हे चिखलदरा पंचायत समितीत सहाय्यक कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत आहेत.
त्यांनी इंदिरा आवास घरकुल योजनेमधील धनादेश त्यांच्या खात्यात वळता करण्यासाठी चंद्रकांत जिरापुरे यांना म्हटले होते. परंतु त्यांनी धनादेश काढण्यासाठी दोन हजार रुपयांची रक्कम मागितली होती. त्यांनी ही लाच सोनापूर येथील तक्रारदाराच्या राहात्या घरी देताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. नागरिकांनी अशाच प्रकारे भ्रष्टाचाराबाबत तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक एम.डी. चिमोटे यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)