न्यायाधीशांच्या आत्महत्येचे गूढ कायम
By Admin | Updated: March 9, 2016 00:56 IST2016-03-09T00:56:37+5:302016-03-09T00:56:37+5:30
चांदूररेल्वे : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील वरिष्ठ स्तर न्यायाधीश अनुप जवळकर यांच्या आत्महत्येचे गूढ अद्यापही कायम आहे.

न्यायाधीशांच्या आत्महत्येचे गूढ कायम
चांदूररेल्वे : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील वरिष्ठ स्तर न्यायाधीश अनुप जवळकर यांच्या आत्महत्येचे गूढ अद्यापही कायम आहे.
न्यायाधीशांच्या मृत्यूप्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी चांदूररेल्वेचे ठाणेदार गिरीश बोबडे यवतमाळात दाखल झाले आहेत. अद्याप जवळकर यांच्या आत्महत्येबाबत कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती मिळालेली नाही. न्यायाधीश जवळकर यांनी चांदूररेल्वेनजीकच्या मांजरखेड येथील रेल्वेमार्गावर ५ मार्च रोजी मध्यरात्री रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेबद्दल उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. न्यायाधीश पदावर कार्यरत अनुप जवळकर यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय का घतेला? यासाठी त्यांच्या कुटुंबीयांचीसुद्धा चौकशी केली जाणार आहे.
पोलीस सर्व बाजूंनी घटनेचा सखोल तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)