स्पायडर मॅन टोळीतील तिघांना न्यायालयीन कोठडी
By Admin | Updated: September 14, 2015 00:06 IST2015-09-14T00:06:33+5:302015-09-14T00:06:33+5:30
स्पायडर मॅन टोळीतील राम मढावी, अनिल आत्राम व सुनील संकतची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

स्पायडर मॅन टोळीतील तिघांना न्यायालयीन कोठडी
अमरावती : स्पायडर मॅन टोळीतील राम मढावी, अनिल आत्राम व सुनील संकतची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. खोलापुरी गेट पोलिसांनी तीनही आरोपींची चौकशी करून दोन मोबाईल व एक किलो चांदी जप्त केल्यावर तिघांनाही रविवारी न्यायालयात हजर केले होते.
गुन्हे शाखेने तिन्ही आरोपींना अटक करुन पोलीस कोठडीत घेतली होती. आरोपींची चौकशी करून त्यांच्याजवळून १८०० ग्रॅम चांदीची नाणी जप्त केली होती. त्यानंतर खोलापुरी गेट पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले होते. त्यांनीही आरोपींजवळून एक किलोची चांदी व मोबाईल जप्त केले. शनिवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्यावर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. आता स्पायडर मॅन टोळीतील तिघांनाही राजापेठ व कोतवाली पोलीस ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)