पेढीबाधितांमध्ये हर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 00:06 IST2016-02-09T00:06:16+5:302016-02-09T00:06:16+5:30

आज मिळेल, उद्या मिळेल अशा प्रतीक्षेत असलेल्या निम्न पेढी बाधित कुटुंबांना घरांच्या मोबदल्याच्या वितरणास सोमवारपासून सुरुवात झाली.

Joy in the heart | पेढीबाधितांमध्ये हर्ष

पेढीबाधितांमध्ये हर्ष

अमरावती : आज मिळेल, उद्या मिळेल अशा प्रतीक्षेत असलेल्या निम्न पेढी बाधित कुटुंबांना घरांच्या मोबदल्याच्या वितरणास सोमवारपासून सुरुवात झाली. सोमवारी केवळ ३० कुटुंबप्रमुखांना घरांचा मोबदला वितरीत करण्यात येणार होता. मात्र, उत्सुकतेपोटी अळणगाव येथील शेकडो ग्रामस्थांनी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हजेरी लावली. भातकुली तालुक्यातील अळणगाव हे गाव निम्पपेढी प्रकल्पाचा बुडित क्षेत्रात असून त्यांचे पुनर्वसन कठोरा लगत प्रस्तावित आहे. त्यानुषंगाने तेथील ५६३ कुटुंबप्रमुखांना (८-८ ज्यांच्या नावे आहेत अशा) घरांच्या मोबदला देणात येणार आहे. जिल्हा भूसंपादनात या पुनर्वसन अधिकारी जयंत देशपांडे यांच्या मार्गदर्शनात संजय कडू व अन्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी प्रकल्पबाधितांच्या दस्तऐवजांची खातरजमा केल्यानंतर त्यांच्या खात्यात मोबदल्याची रक्कम आॅनलाईन जमा करण्यात येणार आहे.

आॅनलाईन मोबदला
अमरावती : हेमंत वानखडे या प्रकल्पबाधितापासून मोबदला वितरणास सुरुवात झाली. ८ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत ५६३ पैकी ३०० घरधारकांना मोबदला देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतरच्या कालावधीत संबंधितांचा मोबदला बँक खात्यात वळता होणार आहे. त्यांतर २५ फेब्रुवारी ते ८ मार्च या दुसऱ्सा टप्प्यात उर्वरित वितरण होईल. मागील ४ वर्षापासून पेढी प्रकल्पबाधित अळणगाव येथील ग्रामस्थांच्या घरांची संयुक्त मागणी प्रतीक्षा लागून राहिली होती.
पुनर्वसित गावाठाणात घर बांधणी
अळणगाव येथील घरांचा आर्थिक मोबदला मिळाल्यानंतर या गावाच्या पुनर्वसनाचा मार्ग प्रहास्त होणार आहे. स्थायी घरांचा मोबदला मिळाल्या बरोबर यंत्रणेने कठोरा पुनर्वसनमधील कामाला गती द्यावी, जेणे करुन मिळालेल्या रक्कमेतून पुनर्वसन गावठावर हक्काचे घरकुल बांधणे सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Joy in the heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.