शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
4
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
5
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
6
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
7
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
8
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
9
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
10
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
11
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
12
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
13
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
14
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
15
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
16
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
17
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
18
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
19
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
20
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना

‘बफर झोन’मध्ये आरोग्य पथकाशी हुज्जत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान दगावलेल्या हाथीपुरा येथील एका व्यक्तीच्या थ्रोट स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे चित्रा चौक, पठाण चौक, हैदरपुरा, छाया कॉलनी, चांदणी चौक, इतवारा बाजार हा परिसर प्रशासनाद्वारे बफर झोन घोषित करण्यात आला. या ठिकाणी १४ दिवसांपर्यंत आरोग्य पथकाचा वॉच राहणार आहे. त्या अनुषंगाने शहराच्या अन्य प्रभागांतील १३ पथके या ठिकाणी गृहभेटी देत असल्याची माहिती सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी दिली.

ठळक मुद्दे१७ एप्रिलपर्यंत सर्वेक्षण : सुरक्षा पुरविण्यासाठी महापालिका आयुक्तांचे सीपींना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील हाथीपुरा भागात व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या ठिकाणी १७ एप्रिलपर्यंत आरोग्य पथकांचे सर्वेक्षण सुरू राहणार आहे. या दरम्यान काही परिसरात पथकांना माहिती न देता, त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रकार झाला. त्यामुळे पथकातील सदस्यांना सुरक्षा मिळावी व वास्तव माहिती समोर यावी, यासाठी महापालिका आयुक्तांद्वारे सोमवारी पोलीस आयुक्तांना पत्र देण्यात आले.जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान दगावलेल्या हाथीपुरा येथील एका व्यक्तीच्या थ्रोट स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे चित्रा चौक, पठाण चौक, हैदरपुरा, छाया कॉलनी, चांदणी चौक, इतवारा बाजार हा परिसर प्रशासनाद्वारे बफर झोन घोषित करण्यात आला. या ठिकाणी १४ दिवसांपर्यंत आरोग्य पथकाचा वॉच राहणार आहे. त्या अनुषंगाने शहराच्या अन्य प्रभागांतील १३ पथके या ठिकाणी गृहभेटी देत असल्याची माहिती सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी दिली.कुटुंबातील व्यक्तींना मागील तीन दिवसांत ताप, सर्दी, कोरडा खोकला, श्वसनाचा त्रास झालेला आहे का, वृद्ध, दिव्यांगांना काही त्रास होत आहे का, कुटुंबातील कुणी विदेशातून अथवा पुणे, मुंबई, दिल्ली येथून आली आहे का, कोणी कोविड-१९ रुग्णांच्या संपर्कात आले आहे का, आदी माहिती विवरणत्रात भरली जात आहे. याद्वारे हे पथक संपर्कात राहणार आहे. त्यामुळे पथकाला खरी माहिती देणे महत्त्वाचे असताना असहकार्य करून त्यांनाच धमकावण्याचा प्रकार काही विशिष्ट लोकांनी केल्याची तक्रार पथकाद्वारे महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली. त्यामुळे पथकाच्या सुरक्षिततेसाठी आयुक्त प्रशांत रोडे यांनी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना सोमवारी पत्र दिल्याची माहिती आहे.ज्या ठिकाणी गरज आहे, तेथे आरोग्य पथकाला अतिरिक्त सुरक्षा देण्यासंदर्भात पोलीस आयुक्तांना सोमवारी पत्र दिले. सद्यस्थितीत पथकासोबत एक पोलीस कर्मचारी आहे. या परिसरात १७ एप्रिलपर्यंत नागरिकांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.-प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका

टॅग्स :Socialसामाजिक